Apple iPhone 15 Series: Apple यावर्षी iPhone 15 सीरिजचे नवे फोन लाँच करण्याची तयारी करत आहेत. iPhone च्या नव्या सीरिजचे फोन लाँच झाल्यानंतर त्यामध्ये नवे फिचर्स असतात. पण यावेळी येणारा iPhone भारतीयांसाठी आणखी खास असणार आहे. कारण यावेळी iPhone ची निर्मिती भारतातच होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Apple ने भारतात iPhone 15 सीरिजची निर्मिती करण्यासाठी Tata Group शी हातमिळवणी केली आहे.
ट्रेंड फोर्सच्या एका रिपोर्टनुसार, टाटा ग्रुपने तैवानमधील कंपनी Wistron Corp’s ला खरेदी केलं होतं. यानंतर आता स्टीलपासून ते सॉफ्टवेअरपर्यंत सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या भारतीय कंपनीला Apple ने iPhone 15 सीरिजच्या निर्मितीची ऑर्डर दिली आहे. हे दोन्ही फोन याचवर्षी लाँच होण्याची शक्यता आहे.
TrendForce ने दिलेल्या वृत्तानुसार, टाटा ग्रुप Apple साठी चौथा iPhone असेंबलर तयार करु शकतो. सध्या Foxconn, Luxshare आणि Pegatron भारतात Apple साठी iPhones ला असेंबल करतात.
Apple नेहमी आपल्या नव्या सप्लायर कंपनीला छोटी ऑर्डर देतं हे नेहमीच पाहण्यात आलं आहे. त्यामुळे नव्या कंपनीलाही Apple फार मोठी ऑर्डर देईल अशी आशा नाही. रिपोर्टनुसार, टाटा ग्रुप Apple iPhone 15 सीरिजच्या फोनचा 5 टक्के भाग बनवणार आहे. Foxconn, Luxshare आणि Pegatron यांच्याकडे इतर भाग असणार आहे.
Apple च्या या निर्णयामुळे चीनला मोठा फटका बसणार आहे. याआधी चीनमध्येच Apple iPhone ची निर्मिती होत होती. पण आता Apple ने चीनमधून पाय काढता घेण्यास सुरुवात केली असून, भारतातच नव्या iPhone 15 सीरिजच्या निर्मितीची योजना आखली असल्याचं स्पष्ट होत आहे.
Apple कंपनी सप्टेंबर महिन्यात iPhone 15 ची सीरिज लाँच करु शकतं. कंपनीने 2023 सीरिजमध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max हे चार मॉडेल बाजारात आणू शकते अशी चर्चा आहे. कंपनीने नुकतेच भारतात दोन Apple स्टोअर सुरु केले होते. यामधील एक स्टोअर मुंबईत असून दुसरं दिल्लीत आहे.
एप्रिल महिन्यात Apple ने मुंबईत आपलं पहिलं स्टोअर लोकांसाठी खुलं केलं. यावेळी टीम कूक स्वत: लोकांच्या स्वागतासाठी उभे होते. दरम्यान या स्टोअरसर आता भारताने अमेरिका, ब्रिटन, चीन आणि सिंगापूर यांची बरोबर केली आहे. या ठिकाणी Apple चे आऊटलेट आहेत.
मुंबईतील बीकेसीमध्ये असणाऱ्या जिओ वर्ल्ड ड्राइव्हमध्ये असणारं Apple Store 20 हजार फुटांमध्ये वसलं आहे. या स्टोअरमध्ये 100 जणांना नोकरीची संधी मिळाली आहे. यामध्ये सर्वभाषिक घेण्यात आले आहेत जे 25 भाषा बोलू शकतात.