Tata च्या 'या' कारने Hyundai Creta कडून खेचून घेतला पहिला क्रमांक! एप्रिलमध्ये जबरदस्त विक्री; Venue ही स्पर्धेतून बाहेर

Best Selling SUV In April 2023: एप्रिलमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या SUV मध्ये Tata Nexon ने पहिला क्रमांक मिळवला आहे. यासह Tata Nexon ने Hyundai Creta कडून पहिला क्रमांक काढून घेतला आहे. यासह Venue कारही मागे पडली आहे. जाणून घ्या भारतात कोणत्या एसयुव्हीची सर्वाधिक विक्री झाली आहे.  

शिवराज यादव | Updated: May 14, 2023, 06:29 PM IST
Tata च्या 'या' कारने Hyundai Creta कडून खेचून घेतला पहिला क्रमांक! एप्रिलमध्ये जबरदस्त विक्री; Venue ही स्पर्धेतून बाहेर title=

Best Selling SUV In April 2023: गेल्या काही वर्षांपासून हुंडाई मोटर आणि टाटा मोटर्स यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली आहे. ही स्पर्धा एसयुव्ही सेगमेंटमध्ये जास्तच आहे. दरम्यान, कारच्या विक्रीची आकडेवारी समोर आली असून एसयुव्ही सेगमेंटमध्ये राज्य करणारी हुंडाई आता मागे पडली आहे. एप्रिल 2023 मधील टॉप 10 एसयुव्ही कारची यादी समोर आली असून, यामध्ये पुन्हा एकदा Tata Nexon ने बाजी मारली आहे. 

टाटा नेक्सॉन देशातील Best Selling SUV च्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. एप्रिल महिन्यात टाटा मोटर्सच्या नेक्सॉन एसयुव्हीच्या 15 हजार 2 युनिट्सची विक्री झाली आहे. काही महिने झालेल्या चढ उतारानंतरही नेक्सॉन एसयुव्ही गेमचेंजर ठरली आहे. दरम्यान, कंपनीच्या इलेक्ट्रिक मॉडेलचीही मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. 

टाटा नेक्सॉन देश की बेस्ट सेलिंग एसयूवी की लिस्ट में नंबर-1 पर है. टाटा मोटर्स ने नेक्सॉन एसयूवी की अप्रैल 2023 में कुल 15,002 यूनिट्स की बिक्री की है. कुछ महीनों में हुए उतार चढ़ाव को छोड़ दें तो कुल मिलाकर नेक्सॉन टाटा मोटर्स के लिए गेम चेंजर एसयूवी साबित हुई है. वहीं कंपनी हर महीने अच्छी संख्या में नेक्सॉन के इलेक्ट्रिक वर्जन की भी बिक्री कर रही है.

Creta-Venue ला Nexon ने मागे टाकलं

विक्रीची आकडेवारी पाहिली तर, नेक्सॉनने हुंडाई क्रेटा आणि व्हेन्यू यांना मागे टाकलं आहे. एप्रिल 2023 मध्ये हुंडाईने क्रेटा आणि व्हेन्यूच्या अनुक्रमे 14 हजार 186 आणि 10 हजार 342 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या महिन्यात क्रेटाने नेक्सॉनला चांगली स्पर्धा दिली आहेत. विक्रीच्या आकडेवारीत मागे असली तरी क्रेटा नेक्सॉनपेक्षा जास्त मागे नाही. दरम्यान क्रेटाची विक्री वाढवण्यासाठी कंपनीने फेसलिफ्ट मॉडेल बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. 

मारुती ब्रेझाबद्दल बोलायचं गेल्यास, फेसलिफ्ट अवतारात लाँच करण्यात आल्यानंतर तिला नवं जीवनदानच मिळालं आहे. सर्वाधिक विक्री झालेल्या एसयुव्हीच्या यादीत नेक्सॉन आणि क्रेटानंतर मारुती ब्रेझा तिसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने एप्रिल 2023 मध्ये ब्रेझाच्या 11 हजार 836 युनिट्सची विक्री केली आहे. तर या यादीत चौथ्या क्रमांकावर टाटाची मिनी एसयुव्ही Punch ने जागा मिळवली आहे. गेल्या महिन्यात Tata Punch SUV च्या 10 हजार 934 युनिट्सची विक्री झाली आहे. 

नेक्सॉनला ग्राहकांची पसंती का?
 

टाटा नेक्सॉनमध्ये ग्राहकांना फिचर्स, इंजिन, डिझाइन, मायलेज आणि सुरक्षेसह अनेक चांगले फिचर्स मिळतात. टाटा नेक्सॉनला 5 स्टार सेफ्टी रेटिंग असून ग्राहक यामुळे तिला पसंती देत आहेत. तसंच नेक्सॉनच्या इंजिनमध्ये दोन व्हेरियंट पर्याय तेदेखील ग्राहकांना आवडत आहेत. कंपनी नेक्सॉनला एकूण 65 व्हेरियंट्समध्ये विकत आहे. 

Tata Nexon मध्ये Android Auto आणि Apple CarPlay सह सात-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कूल्ड ग्लोव्हबॉक्स, रिअर व्हेंट्ससह ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल आणि रेन सेन्सिंग वायपर देखील मिळतात. टॉप-एंड व्हेरियंटमध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, ऑटो-डिमिंग IRVM, आठ-स्पीकर साउंड सिस्टम आणि एअर प्युरिफायर एअर क्वालिटी डिस्प्लेसह येतात.