Tata Nexon New Varient: टाटा मोटर्सने भारतात सब-4-मीटर एसयूव्ही नेक्सनचं नवं व्हेरियंट XM+(S) लाँच केलं आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 9.75 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. नविन व्हेरियंट चार ट्रिम्समध्ये उपलब्ध असणार आहे. टाटा नेक्शन XM+(S) (पेट्रोल, मॅन्युअल), XMA+(S) (पेट्रोल, ऑटोमॅटिक), XM+(S) (डिझेल, मॅन्युअल), XMA+(S) (डिझेल, ऑटोमॅटिक) अशा चार प्रकारात आहे. टाटा नेस्कन XM+(S) व्हेरियंट वेगेवगळ्या रंगात उपलब्ध आहेत. यात व्हाइट, डेटोना ग्रे, फ्लेम रेड आणि फॉलीज ग्रीन रंगाचा पर्याय आहे.
वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात इलेक्ट्रिक सनरूफ, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 7.0-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 4-स्पीकर सिस्टम, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, रिअर एसी व्हेंट्स, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी-ड्राइव्ह मोड, 12 रियर पॉवर सॉकेट आणि शार्क फिन अँटेना सारखी वैशिष्ट्ये आहेत.
टाटा नेक्सन एसयूव्हीला 1.2-लीटर पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेलचा पर्याय मिळतो. जे स्वयंचलित (AMT) किंवा मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. नवीन नेक्सन XM+(S) प्रकार जोडून, टाटा आता नेक्सन एसयूव्हीचे एकूण 62 प्रकार ऑफर करते ज्यात 33 पेट्रोल आणि 29 डिझेल ट्रिम आहेत.
टाटा नेक्सनची भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये गणना होते. नेक्सन ही देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये चौथी आणि आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून उदयास आली आहे.