TATA च्या 'या' कारने रचला इतिहास, जगभरात चर्चा

टाटा मोटर्सच्या एसयूव्हीने नवा रेकॉर्ड बनवलाय.  

Updated: Dec 8, 2018, 10:30 AM IST
TATA च्या 'या' कारने रचला इतिहास, जगभरात चर्चा  title=

मुंबई : आपल्याकडे असलेली कार सुरक्षेच्या दृष्टीकोनातून व्यवस्थित, मजबूत असावी असं प्रत्येक कार चालकाला वाटत असतं. प्रत्येकाला आपला जीव महत्त्वाचा असतो म्हणूनच कारच्या बाबतीत कोणीही रिस्क घेत नाही. मग थोडे जास्त रक्कम मोजण्यासाठीही ग्राहक तयार होतात. असं असतानाही अनेक कार बनवणाऱ्या कंपन्या अशा प्रकारच्या कार बनवताना कुठे ना कुठे कसर ठेवतातच. पण टाटा नेक्सनची कार सुरक्षेच्या बाबतीत अग्रेसर मानली जाते. एसयूव्हीला सुरक्षेच्या बाबतीत 5 पैकी 5 गुण मिळाले आहेत. यामुळे टाटा मोटर्सच्या एसयूव्हीने नवा रेकॉर्ड बनवलाय. 

कारवर केल्या जाणाऱ्या क्रॅश टेस्टमध्ये या कारने 17 पैकी 16.06 गुण मिळवले आहेत. क्रॅश टेस्टमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारी ही पहिली कार ठरली आहे. भारतामध्ये कार सेफ्टीकडे गांभीर्याने पाहिलं जात याकडेही यानिमित्ताने लक्ष वेधल गेलंय. या कारमध्ये चारही बाजूस एबीएस, सीट बेल्ट रिमाइंडर देण्यात आले आहेत. याआधी झालेल्या टेस्टेमध्ये नेक्सनला 4 गुण मिळाले होते.

किंमत 

टाटा आपली SUV-Naxon ही कार या महिन्यात लाँच करणार असून भारतातून कुठूनही केवळ ११ हजारामध्ये याची प्रीबुकिंग करू शकता. 
अद्याप या कारची किंमत कंपनीतर्फे अधिकृतपणे सांगण्यात आलेली नाही. मात्र ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स ज्या दिवसांमध्ये आपली ही कार लाँच करत आहेत.एसयूवी नेक्सनची किंमत ही ६.५ लाखापासून ते ९.५ लाखापर्यंत असण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

यांच्याशी स्पर्धा 

त्या दिवसांमध्ये मारूती सुझुकीची विटारा ब्रेझा आणि फोर्डची इको स्पोर्ट कार देखील चांगला बिझनेस करत आहे. त्यामुळे निक्सॉनसोबत या कार कॉम्पिटीशन करणार आहेत.

डिझेल इंजीन

इंजीन क्षमता:  १.५ लीटर ४ सिलेंडर रेवोटॉर्क
पॉवर: ११० पीएस
टॉर्क: २६० एनएम
गियरबॉक्स: ६-स्पीड म्यॅनुअल

पेट्रोल इंजीन 

इंजीन क्षमता: १.२ लीटर ३ सिलेंडर रेवोट्रोन
पावर: ११० पीएस
टॉर्क: १७० एनएम
गियरबॉक्स: ६ स्पीड म्यॅनुअल