फाईव्ह स्टार मिळवणारी ही पहिली भारतीय कार

जागतिक स्तरावरील एनसीएपीने (NCAP) टाटा मोटर्सच्या एसयूव्ही नेक्सॅानला फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग दिली आहे. तसेच महिंद्राच्या मराज्जोला या श्रेणीत फोर स्टार रेटिंग मिळाली आहे. त्याचबरोबर टाटा नेक्सॅान भारतातील पहिली फाईव्ह स्टार रेटींग मिळवणारी कार ठरली आहे.

Updated: Dec 7, 2018, 11:15 PM IST
फाईव्ह स्टार मिळवणारी ही पहिली भारतीय कार title=

मुंबई:जागतिक स्तरावरील एनसीएपीने (NCAP) टाटा मोटर्सच्या एसयूव्ही नेक्सॅानला फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग दिली आहे. तसेच महिंद्राच्या मराज्जोला या श्रेणीत फोर स्टार रेटिंग मिळाली आहे. त्याचबरोबर टाटा नेक्सॅान भारतातील पहिली फाईव्ह स्टार रेटींग मिळवणारी कार ठरली आहे.

टाटा मोटर्सने शुक्रवारी एका वक्तव्यात म्हटले आहे, जागतिकस्तरावर प्रमाणपत्र देणाऱ्या एनसीएपीने एसयूव्ही नेक्सॉनला फाईव्ह स्टार रेटींग दिली आहे. मात्र लहानमुलांसाठी एसयूव्ही नेक्सानला थ्री स्टार रेटींग देण्यात आली आहे.

एनसीएपी कारची टक्कर करुन सुरक्षा तपासणी करतात.  एनसीएपीकडून कारच्या संरचनेची एकसमानता आणि संपूर्ण सुरक्षिततेचे पुनरावलोकन करते. कारची तपासणी समोरील आणि दोन्ही बाजूला टक्कर करुन केली जाते. 

यात यूटीलिटी वाहन निर्माण करणारी घरगुती कंपनी महिन्द्रा अॅण्ड महिन्द्रा यांनी माहिती दिली आहे की, त्यांच्या एमयूव्ही मराज्जोला एनसीएपीने फोर स्टारची रेटींग दिली आहे.