सावधान! तुम्ही करतायत या चुका, स्मार्टफोनचंही आयुष्य होईल कमी

तुमच्या या चुका करतायत फोनचं आयुष्य कमी, पाहा नेमकं काय टाळायचं

Updated: May 23, 2022, 03:48 PM IST
सावधान! तुम्ही करतायत या चुका, स्मार्टफोनचंही आयुष्य होईल कमी title=

मुंबई : आजकाल खाण्यापिण्यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाचा झालाय तो म्हणजे स्मार्टफोन. गेल्या काही वर्षात लोक स्मार्टफोनसोबत खूप जास्त अॅडिक्ट झाले आहेत. आपला स्मार्टफोनचा वापरही वाढला आहे. जास्त अॅप वापरल्याने तो हँग होणं किंवा बॅटरी खराब होणं अशा अनेक तक्रारी येतात.

स्मार्टफोनचं आयुष्य कमी होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे काही गोष्टी जाणून घेऊया. तुम्ही जर या चुका करत असाल तर आजच टाळा ज्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही. 

प्ले स्टोर सोडून इतर कुठल्याही लिंकवरून एप डाऊनलोड करू नका. त्यामुळे फोनमध्ये व्हायरल येण्याचा धोका असतो. याशिवाय डेटा हॅक होण्याची भीती असते. मालवेअरसारखे घातक व्हायरल फोन खराब करतात. एप डाऊनलोड करताना ती काळजी घ्या. 

फोन क्लिनिंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करू नका. त्यामुळे फोन जास्त हँग होतो. त्यामुळे फोन लवकर खराब होऊ शकतो कोणतेही थर्डपार्टी अॅप वापरताना विचार करा. 

प्रत्येक फोनसाठी वेगळा चार्जर देण्यात आला आहे. मात्र तरीही बऱ्याचदा वेगळा चार्जर वापरला जातोय दुसऱ्या मॉडेलचा चार्जर वापरल्याने फोनचं आयुष्य कमी होतं. 

फोनमध्ये अॅप सतत अपडेट करत राहाणं गरजेचं असतं. त्यामुळे फोनची मेमरी कमी होते म्हणून अॅप अपडेटच करायचं नाही हे करणं चुकीचं आहे. त्यामुळे मोबाईलचं आयुष्य कमी होऊ शकतं. 

फोनमध्ये नेहमी अपडेट ऑपरेटींग सिस्टिम वापरा. ऑपरेटिंग सिस्टिम जुनी असेल तर फोन हँग होतो. काहीवेळा नोटिफिकेशन येत नाहीत. फोन लागत नाही. फोनमध्ये अनेकदा अडचणी येतात. सिस्टिम अपडेट केल्याने फोनमध्ये सिक्युरिटी आणि स्पीड दोन्ही वाढतो. व्हायरसचा धोका कमी होतो.