मुंबई : सणासुदीच्या काळात तुम्ही जर योग्य बजेटमध्ये चांगली बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. देशातील दुचाकी कंपन्या सामान्यांना परवडणाऱ्या बाईक्स् तयार करीत आहेत, ज्या मायलेज चांगल्या देणाऱ्या आहेत. सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसत असल्याचे दिसत आहेत. त्याचवेळी, त्यांची देखभाल देखील खूप कमी आहे. आज आम्ही तुम्हाला या बाईक्सबद्दल सांगणार आहोत.
बजाज सीटी १०० चे दोन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पहिले सीटी १०० केएस पूर्णपणे आणि दुसरे सीटी १०० ईएस एस. या दोन्ही प्रकारांच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर सीटी १०० केएस एलोईची किंमत ४३,९९४ रुपये आहे तर सीटी १०० ईएसची किंमत ५१,६७४ रुपये आहे. बीएस ६ इंजिनमध्ये उपलब्ध असलेल्या या बाईकमध्ये १०२ सीसीचे सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन ७.७bhp पॉवर आणि ८ Nm टॉर्क देते. याशिवाय इंजिन चार स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.
देशातील नंबर वन टू-व्हीलर निर्माता कंपनी हीरो मोटोकॉर्पची एचएफ डिलक्स बाईक सध्या पाच प्रकारांत आली आहे. याची किंमत ४९ हजार रुपयांपासून सुरू होते. बाईकमध्ये बीएस ६ ९७.२ सीसी इंजिन दिले गेले आहे जे ८००० आरपीएम वर ७.९४ बीएचपीची पॉवर टॉर्क जनरेट करते.
जर आपले बजेट ६० हजार ते ६५ हजार रुपयांच्या श्रेणीत असेल तर आपण हिरोची स्प्लेंडर प्लस बाइक खरेदी करू शकता. या बाईकचे तीन प्रकार सध्या उपलब्ध आहेत. बाईकच्या किक स्टार्ट व्हेरिएंटची किंमत ६०,५०० रुपये आहे, सेल्फ स्टार्ट व्हेरिएंटची किंमत ६२,८०० रुपये आहे आणि स्प्लेंडर प्लस सेल्फ स्टार्ट आय ३ एस व्हेरिएंटची किंमत ६४,०१० रुपये आहे.
गाव आणि छोट्या शहरातील लोकांच्या गरजेनुसार टीव्हीएसची किंमत ५८ हजार ते ६५ हजार रुपयांपर्यंत आहे. या बाईकमध्ये १०९.७ सीसी ड्युरा-लाइफ इंजिन आहे जी ९.५ बीएचपी पॉवर आणि ८.७ एनएम टॉर्क देते.