WhatsApp वर 'हे' नवे फिचर्स तुम्हाला देणार Superpower; पाहा काय काय करता येणार...

WhatsApp कडून असंख्य युजर्ससाठी आता एक नवीन फिचर्स आणलं जाणार आहे. ज्यामुळं नाही म्हटलं तरीही हे फिचर्स तुम्हाला एकाहून अनेक Superpower देणार आहेत. WhatsApp वरील व्हिडीओ बघताना playback control चे पर्याय देणार आहे. तर या फीचरनुसार युजर्स व्हिडीओ पाहताना आता YouTube सारखे फीचर्स वापरू शकणार आहेत. म्हणजेच त्यांना playback control मिळणार आहे. या फिचर्समुळं अॅपमधील व्हिडीओ प्ले किंवा पॉज किंवा प्ले बॅक करता येणार आहे.  

Updated: Nov 3, 2023, 01:15 PM IST
WhatsApp वर 'हे' नवे फिचर्स तुम्हाला देणार Superpower; पाहा काय काय करता येणार...  title=

Whatsapp New Features : WhatsApp कडून असंख्य युजर्ससाठी आता एक नवीन फिचर्स आणलं जाणार आहे. ज्यामुळं नाही म्हटलं तरीही हे फिचर्स तुम्हाला एकाहून अनेक Superpower देणार आहेत. WhatsApp वरील व्हिडीओ बघताना playback control चे पर्याय देणार आहे. तर या फीचरनुसार युजर्स व्हिडीओ पाहताना आता YouTube सारखे फीचर्स वापरू शकणार आहेत. म्हणजेच त्यांना playback control मिळणार आहे. या फिचर्समुळं अॅपमधील व्हिडीओ प्ले किंवा पॉज किंवा प्ले बॅक करता येणार आहे.  

नवे फिचर्स : 

गेल्या काही काळापासून WhatsApp कडून मेटा युजर्सना whatsapp मध्ये कोणते नवे फिचर्स हवे आहे यासंदर्भातील अनेक चाचण्या घेत ते सुरू करण्यावर जास्त गुंतवणूक केली आहे. यापूर्वी whatsapp ने अनेक फिचर्स लाँच केले होते. ज्यामध्ये वन्स मोड स्क्रीनशॉट ब्लॉक, 31 पार्टीसिपेन्ट्सना  ग्रुप कॉलमध्ये परवानगी देण्यापर्यंतच्या फिचर्सचा समावेश होता. 

सर्वसामान्य व्हॉट्सअप युजर्सपासून व्यावसायिकांसाठीही हे फिचर उपयुक्त ठरले. त्याच आधारे आता whatsapp एका नवीन फिचरची चाचणी करत आहे. हे फिचर सध्या अँड्रॉइड फोनसाठी WhatsApp च्या बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. तर, चाचणी यश्वी ठरल्यास हे फिचर सर्वसामान्य युजर्ससाठी सुरु करण्यात येईल.  

WABetaInfo त्या माहितीनुसार नवीन व्हिडिओ प्लेबॅक कंट्रोल युजर्सला 10 सेकंदांनी पुढे आणि मागे जाण्याची परवानगी देतात. हे नवीन पर्याय YouTube वर वापरल्या जाणार्‍या फिचर सारखेच असणार आहेत. ज्यामुळं व्हिडीओ पाहताना अपेक्षित भागावर पोहोचणे सहज शक्य होणार आहे. 

प्लेबॅक व्यतिरिक्त WhatsApp नवीन प्रायव्हसी-फोकस्ड फिचरही देत आहे. यामध्ये 'अल्टरनेट प्रोफाइल'चा पर्यायही जोडण्यात येणार आहे. जे प्रोफाइल फोटो सारखी माहिती लपवते आणि युजर्सला त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या कॉन्टॅक्टसाठी वेगळा फोटो आणि नाव सेट करण्याचे पर्याय देते.  अद्याप या फिचरची चाचणी सुरु असून ते युजर्ससाठी जारी करण्यात आलेलं नाही. येत्या काळातील नव्या अपडेटमध्ये ते रिलीज केले जाऊ शकते.