27 वर्षांच्या गेमरने कमावले 70 करोड

गेम खेळ आणि करोडपती व्हा 

27 वर्षांच्या गेमरने कमावले 70 करोड  title=

मुंबई : आता मोबाईल सतत हातात राहणारी वस्तू झाली आहे. काहीही कारण नसताना सतत मोबाईल पाहणं ही आता सवय जडली आहे. असं असताना काहीच काम नाही म्हणून आणि विरंगुळा म्हणून मोबाईलवर सर्रास गेम खेळत राहतात. पण आता गेम खेळणं हा देखील एक प्रकारचा बिझनेस झाला आहे. 

गेम फक्त लोकं वेळ घालवण्यासाठी नाही खेळत तर आता यातून पैसे कमावण्याचं साधन म्हणून देखील पाहिलं जातं. नेटीझन्समध्ये लोकप्रिय असलेला PUBG या गेममधून देखील लोकं आता पैसे कमावत असल्याचं समोर आलं आहे.  पबजी हा गेम भारतात जरी जास्त लोकप्रिय नसला तरीही अमेरिकेत हा खेळ भरपूर खेळला जातो. पबजी सारखाच Fortnite हा खेळ देखील अमेरिकेत जास्त प्रमाणात खेळला जातो. 

27 वर्षांच्या निंजा नावाच्या गेमरने 2018 मध्ये पबजीमधून 10 मिलियन डॉलर म्हणजे तब्बल 70 करोड रुपयांची कमाई केली आहे. या गेमरने Youtube आणि Twitch ची मदत घेतली आहे. निंजा गेमिंगच्या जगात एक नावाजलेलं नाव आहे. टायलर ब्लेविन्स असं याचं नाव असून तो गेम करता निंजा या युझरनेमचा वापर करतो. 2018 मध्ये निंजा Twitch वर नंबर 1 स्ट्रीमर आहे. 

Youtube वर निंजाच्या फॉलोअर्सची संख्या 21 मिलियनहून अधिक आहे. याच्या पूर्ण कमाईचा 70 टक्के भाग हा फक्त Youtube आणि Twitch मधला आहे. Twitch वर निंजाला 12.5 मिलियन लोक फॉलो करत असून यामधील 40 हजार लोकं गेम खेळण्यासाठी पैसे देतात. यांनी सब्सक्रिप्शन मॉडेल ठेवले असून यामध्ये 5,10 आणि 20 डॉलर प्रत्येक महिने भरावे लागतात.