10 Rupee Note: 10 रुपयांची ही जुनी नोट तुम्हाला बनवेल मालामाल

इंग्रजांच्या काळात छापली गेलेली ही नोट तुम्हाला चांगले पैसे मिळवून देऊ शकते.

Updated: Sep 28, 2022, 08:33 PM IST
10 Rupee Note: 10 रुपयांची ही जुनी नोट तुम्हाला बनवेल मालामाल

मुंबई : 10 रूपयांची नोट तुम्हाला लाखो रुपये देऊ शकते. आजकाल लोकं जुन्या नोटा आणि नाणी खूप जास्त किमतीत खरेदी करताना दिसतात. याचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे आज त्यांची मागणी वाढली आहे. याशिवाय काही लोकांना नाणी आणि जुन्या नोटा जमा करायला आवडतात.

ज्यांना जुन्या नोटा जमा करण्याचा छंद असेल किंवा काही लोकं ते संग्रहालयमध्ये ठेवतात. नोटा आणि नाण्यांसाठी ते मोठी रक्कम द्यायला ही तयार असतात. जर तुमच्याकडे अशा प्रकारचे नाणे किंवा नोट असेल तर तुम्ही घरी बसून करोडपती बनू शकता.

आज आम्ही तुम्हाला ज्या 10 रुपयांच्या नोटाविषयी सांगणार आहोत ती सामान्य नोट नसून अतिशय खास नोट आहे. या नोटेवर अशोक स्तंभाची मूर्ती आहे आणि ती ब्रिटिशांनी 1943 मध्ये जारी केली होती.

ही नोट खूपच दुर्मिळ झाली आहे. जर तुमच्याकडे अशी 10 रुपयांची नोट असेल तर तुम्ही ती ऑनलाईन पोर्टलवर विकून सहज चांगले पैसे कमवू शकतात.

प्रथम पोर्टलवर जा. (अनेक पोर्टल उपलब्ध आहेत.)
तेथे विक्रेता म्हणून नोंदणी करा.
तिथे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल नोंदवा.
तुमच्याकडे असलेल्या नोटचा फोटो तिथे अपलोड करा.
आता ज्याला तुमची नोट विकत घ्यायची आहे. तो तुमच्याशी संपर्क साधेल.