मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाला 24 एप्रिलपर्यंत TikTok वरील बंदीविषयी अंतिम निर्णय घेण्यास सांगितले आहे. तसे न झाल्यास, TikTok वर असलेली बंदी उठवण्यात येईल आणि लोक पुन्हा TikTok वापरतील. मुख्य न्यायाधीश रंजन गोगाई यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची सुनावणी होत आहे. मुख्य न्यायाधीशांच्या व्यतिरिक्त या खंडपीठात न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचाही समावेश आहे.
मद्रास हायकोर्टाने ३ एप्रिलला TikTokवर यासाठी बंदी केली होती, कारण त्यांचे म्हणणे होते की, या अॅपमुळे लहान मुलांवर वाईट परिणाम होतील. चीनी कंपनीने उच्च न्यायलयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने सुनावणीच्या दरम्यान मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवण्याचा आदेश दिला.
सर्वोच्च न्यायालयाने त्याच दिवशी या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 एप्रिलला ठेवली होती. पुढच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाला याबाबत शेवटचा निर्णय घेण्याचा आदेश दिला. मात्र या प्रकरणाबाबतची पुढची सुनावणी आता 24 एप्रिलला होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशास आव्हान देणाऱ्या TikTok कंपनीने सांगितले की, ज्या समस्येशी आम्ही लढत आहोत, तो वाद इतर सोशल मीडिया मंचांबरोबर आहे, मात्र TikTok विरुद्ध निवडक कारवाई संविधानाच्या कलम 14चं उल्लंघन आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मागील आदेशानुसार, सरकारने Google आणि Apple कंपनीला त्यांच्या अॅपस्टोअरमधून TikTokअॅप काढून टाकण्यास सांगितले होते. सरकारने सांगितल्यावर हे अॅप आता PlayStore वर उपलब्ध नाही. मात्र, ज्यांच्या मोबाईलमध्ये हे आधीचं डाऊनलोड झाले आहे, ते सहजतेने या अॅपचा वापर करु शकता.
TikTok एक व्हीडिओ बनवण्याचं अॅप आहे. त्याच्या लोकप्रियतेची कल्पना याच गोष्टींवर लावू शकता की, हे अॅप भारतातील तिसरं अॅप आहे. जे सर्वात जास्त डाऊनलोड झाले आहे. केवळ मार्च महिन्यात देशभरात 18.8 कोटी लोकांनी या अॅपला डाऊनलोड केलं आहे. भारतात चक्क 8.8 कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. पूर्ण जगभरात 50 कोटीपेक्षा जास्त लोक या अॅपचा वापर करतात.