नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी देशातील टेलिकॉम ऑपरेटर्स कोरोनाची डायलर ट्यून ऐकवतात. देशात वेगवेगळ्या पद्धतीन सरकारने कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी जाहिराती केल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी पोस्टर बॅनर तर टेलिकॉम ऑपरेटर्सच्या डायलर ट्युनमधून कोरोना बाबत जनजागृती करण्यात येत होती.
कोरोना संसर्गाला भारतात एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे. त्यामुळे कोणालाही कॉल करण्याआधी कोरोनाची ट्यून ऐकावी लागते. अनेक नागरिकांनी ही बाब नकारात्मकतेकडे घेऊन जाणारी असून ती बंद करण्याची मागणी केली आहे. अद्यापतरी कोरोनाची ट्यून बंद झालेली नाही. कोरोनाच्या टोनमुळे तुम्हालाही वैताग आला असेल तर, पुढील स्टेप्स वापरून तुम्ही ही ट्यून कायमची बंद करू शकता.
Airtel आणि Vi च्या ग्राहकांनी कोरोना ट्यून कशी बंद करावी
स्टेप 1 - जर तुम्ही एअरटेल वापरकर्ते आहात तर डायलरवरून *646*224# डायल करावे लागेल. हा नंबर डायल केल्यानंतर कॅसेलेशन रिक्वेस्ट सबमिट करण्यासाठी की पॅडवरून 1 क्लिक करा
स्टेप 2 - जर तुम्ही वोडाफोन - आयडीयाचे युजर आहात तर, कॅसेलेशन रिक्वेस्ट एक टेक्स्टच्या स्वरुपात पाठवण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला 144 वर 'CANCT' मॅसेज पाठवावा लागेल. तुम्हाला कॉलर ट्यून रद्द केल्याचा संदेश येईल.
Jio आणि BSNL च्या ग्राहकांनी कोरोना ट्यून कशी बंद करावी
स्टेप 1 - जर तुम्ही जिओच्या नंबरचा उपयोग करीत आहात तर, तुम्हाला 'STOP'संदेश टाइप करावा लागेल. या संदेशाला 155223 वर पाठवावा लागेल. त्यानंतर कोरोना कॉलर ट्यून रद्द होईल.
स्टेप 2 - BSNLच्या वापरकर्त्यांना कोरोना कॉलर ट्यून बंद करण्यासाठी 56700 किंवा 5699 या नंबरवर 'UNSUB'लिहून पाठवावे लागेल.