टोयोटा कारच्या किंमतीत वाढ

तुम्ही टोयोटा कंपनीची कार घेण्याचा विचार करत आहात. तर, मग ही बातमी तुमच्यासाठी खुपच महत्वाची आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 14, 2017, 04:39 PM IST
टोयोटा कारच्या किंमतीत वाढ title=

मुंबई : तुम्ही टोयोटा कंपनीची कार घेण्याचा विचार करत आहात. तर, मग ही बातमी तुमच्यासाठी खुपच महत्वाची आहे.

टोयोटा कंपनीने सेस वाढल्याने आपल्या गाड्यांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे त्यामध्ये इनोव्हा, फॉर्च्युनर, कोरोला आणि इटियॉस या गाड्यांचा समावेश आहे.

या गाड्यांच्या किंमतीत २% पासून ७% पर्यंत वाढ करण्यात आली आहे. गाड्यांच्या नव्या किंमती १२ सप्टेंबरपासून लागू करण्यात आल्या आहेत. जीएसटी परिषदेने आपल्या गेल्या बैठकीत मिड-साइज गाड्यांवरील सेस दोन टक्क्यांनी वाढवत १७% केला होता. त्यानंतर टोयोटा कंपनीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. आहे.

टोयोटाने दिल्लीमध्ये इनोव्हा क्रिस्टा गाडीची किंमत ७८,००० रुपये वाढवली आहे. तर फॉर्च्युनर गाडीच्या ग्राहकांना १,६०,००० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. त्यासोबतच कोरोला आणइ इटियॉस या गाड्यांच्या किंमतीत ७२,००० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.