TRAIचा नवा नियम, फसवणुकीला चाप

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAIच्या नव्या नियमानुसार KYC मेकॅनिझम लागू करण्यात येईल.

Updated: Nov 17, 2022, 11:51 PM IST
TRAIचा नवा नियम, फसवणुकीला चाप  title=

नवी दिल्ली :  आता तुमच्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह नसला तरी फोन करणा-या व्यक्तीचं नाव समजणार आहे. त्यासाठी ट्रूकॉलर किंवा इतर कोणत्याही अॅप्सची तुम्हाला गरज पडणार नाही कारण टेलिकॉम रेग्युलेटरी TRAIनं यासंबंधीची नवी नियमावली जारी केलीय. मोबाईलच्या माध्यमातून होणा-या फसवणुकीला आता आळा बसणार आहे. कारण लवकरच नंबर सेव्ह नसला तरी समोरच्या व्यक्तीचं नाव मोबाईल स्क्रीनवर दिसेल. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAIच्या नव्या नियमानुसार KYC मेकॅनिझम लागू करण्यात येईल. (trai kyc if mobile number is not saved in your mobile know name of the person calling)

आतापर्यंत अनोळखी नंबरवरुन येणारे कॉल ओळखण्यासाठी ट्रूकॉलर किंवा इतक काही अॅपचा वापर केला जायचा, अनेक कंपन्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप इनबिल्ट असायचं पण ट्रूकॉलरसारखी अॅप्स युसर्जची माहिती मार्केटींग कंपन्यांना विकतात. स्पॅम आणि बंक कॉल्सच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होते.. म्हणूनच आता ट्रायनं नवीन नियम आणलेत ज्यामुळे अशा अॅपची गरजच भासणार नाही. ट्रायच्या नव्या नियमानुसार..

काय आहे TRAIचा नवा नियम?

ज्याच्या नावावर सिम असेल त्याचं नाव दिसेल. टेलिकॉम कंपनीच्या KYCमध्ये जे नाव असेल तेच स्क्रीनवर दिसेल. फेक कॉल्सपासून वाचण्यासाठी या सुविधेचा सर्वाधिक वापर होईल. स्पॅम, बंक कॉल्स करुन गंडा घालणा-यांना आळा बसेल. ट्रूलकॉलर, व्हॉट्सअॅप कॉललाही TRAIच्या कक्षेत आणलं जाईल.

TRAIच्या या नव्या नियमावलीमुळे मोबाईल कंपन्यांची KYC प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल. सिम कार्ड विकताना कागदपत्रांची सत्यता पडताळणी आणखी कडक होईल. साहजिकच स्पॅम कॉल्स, खोट्या नावानं होणारे कॉल्स आणि त्यातून होणारी फसवणूक यांना आळा बसेल. TRAIचा हा नियम नेमका कोणत्या तारखेपासून लागू होईल हे निश्चित नाही पण महिन्याभराच्या आत हा नियम लागू होण्याची शक्यता आहे.