Jeep Grand Cherokee Price: जीपने भारतात आपली नवी कोरी ग्रँड चेरोकी लाँच केली आहे. या गाडीचं डिझाइन परदेशात विकल्या जाणाऱ्या ग्रँड वॅगोनियरसारखीच आहे. ही गाडी व्होल्वो XC90, रेंज रोव्हर वेलार, मर्सडिज बेंज जीएलई, ऑडी Q7 आणि बीएमडीएब्ल्यू X5 या गाड्यांशी स्पर्धा करेल. या गाडीची सुरुवातीची किंमत 77.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे पेट्रोल वर्जन असून या गाडीचं असेंबलिंग स्थानिक पातळीवर केलं जाणार आहे. उत्तर अमेरिकेबाहेर पहिल्यांदाच ग्रँड चेरोकी असेंबल केली जाणार आहे. यामध्ये 110 हून अधिक सेफ्टी फीचर्स दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यात 8 एअरबॅग्स आणि लेव्हल 2 ADAS असे सेफ्टी फीचर दिले आहेत. या गाडीची बुकिंग या आधीच सुरु करण्यात आली आहे.
जीपमध्ये 2.0 लीटर चार सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 272 एचपी पॉवर आणि 400 एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स जोडलं आहे. नवीन जीप ग्रँड चेरोकी 533 mm खोल पाण्यातही चालू शकते. उत्तम राइडिंगसाठी, या ऑफ-रोड वाहनाला ऑटो, स्पोर्ट, मड/सँड आणि स्नो असे मोड दिले आहेत. मागील बाजूस 1,076-लिटरची मोठी बूट स्पेस मिळते. दुसर्या रांगेतील सीट्स खाली केल्यास आणखी वाढवता येते.
Everything that makes the all-new Grand Cherokee, the most awarded SUV ever. Reserve your Grand Cherokee.https://t.co/mnW3PkRVry pic.twitter.com/6lNgjsWVry
— Jeep India (@JeepIndia) November 17, 2022
या गाडीच्या इंटीरियरमध्येही 10.1-इंचाची सेंट्रल टचस्क्रीन आहे. याशिवाय, समोरच्या प्रवाशासाठी डॅशबोर्डमध्ये 10.1-इंच स्क्रीन एम्बेड केलेला आहे. विशेष म्हणजे स्क्रीनला प्रायव्हसी ट्रीटमेंट दिलं आहे. त्यामुळे ड्रायव्हर ड्राईव्ह करत असताना लक्ष विचलीत होत नाही.
बातमी वाचा- Tesla च्या विना ड्रायव्हर कारचा रस्त्यावर धिंगाणा, सोशल मीडियावर धक्कादायक Video Viral
या फ्लॅगशिप SUV मध्ये 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10-इंच हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जिंग पॅड, ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कंपॅटिबिलिटी, मागील सीट एंटरटेनमेंट स्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ, लेदर अपहोल्स्ट्री, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॉवर्ड टेलगेट आणि लेव्हल-2 ADAS वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.