मोठं कुटुंब मोठी कार! आता कार घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण

मोठं कुटुंब तर मोठी कार आणि ती पण स्वस्त. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही.

Updated: Aug 8, 2022, 07:03 PM IST
मोठं कुटुंब मोठी कार! आता कार घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण title=
trending news renault triber 7 seater mpv company giving bumper offer in maratha

Renault Triber : सर्वसामान्यांची अनेक स्वप्न पूर्ण होतात होता म्हातारपण येतं. सर्वसामान्यांचं पहिलं स्वप्न असतं आपलं स्व:ताचं घर (House)असावं. तर दुसरं स्वप्न नसतं ते म्हणजे या घरासमोर चाकचाकी गाडी (Car)उभी असावी. पण पहिलेच महागाईचा भडका त्यात घराच्या आणि गाडीच्या किंमती आकाशाला भिडलेल्या आहेत. अशात मग हे स्वप्न पूर्ण कसं होणार. मार्केटमध्ये कमी किंमतीत अनेक गाड्या आजकाल मिळतं. पण जर तुमचं कुटुंब मोठं आहे आणि तुम्हाला मोठी गाडी हवी असेल तर जास्त पैसे मोजावे लागतात. पण आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी (Good News)आहे. 

मोठं कुटुंब तर मोठी कार आणि ती पण स्वस्त. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. Renault Triber ही कार आता तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. आता Renault Triber या कारची माहिती आपण जाणून घेऊयात. (trending news renault triber 7 seater mpv company giving bumper offer in maratha)

इंजिन आणि मायलेज

या कारसोबत तुम्हाला रेनॉल्ट ट्रायपरला 1.0-लिटर नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळतं. तर या गाडीचं इंजिन हे 72PS पॉवरचं असून ते 96NM टॉर्क जनरेट करु शकतं. या इंजिनमध्ये 5स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMTचं ऑप्शन आहे. तर ही कार 19 kmplपर्यंत मायलेज देते. पण या कारमधील AMTचं मायलेज थोडं कमी आहे. तर MPV हे एकूण 10 प्रकारांमध्ये मिळतं. 

या कारची किंमत आणि सेफ्टी रेटिंग

Renault Triber ही कार 5,91,800 रुपयांपासून सुरु होते ते या कारचं बेस्ट मॉडेल 8,50,800 पर्यंत जाते. या कारचा बेस्ट व्हेरिएंट RXEची किंमत 5,9,1800 इतकी आहे. तर RXZ EASY-R DUALTONE हे टॉप व्हेरिएंट  8,50,800 पर्यंत जातं. या कारच्या सेफ्टी रेटिंगबद्दल बोलायचं झालं तर ग्लोबल NCAP ने क्रॅशने घेतलेल्या टेस्टमध्ये एडल्टसाठी 4 ते चाइल्डसाठी 3 स्टार रेटिंग दिलं आहे. 

या कारमधील स्टीयरिंगवर ऑडियो कंट्रोल आहे. त्याशिवाय पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, LED DRLsसह प्रोजेक्टर हेडलॅम्प, सिक्स-वे अॅडजस्टेबल डायव्हर सीट अशी या कारची वैशिष्टं आहेत. याशिवाय या कारमध्ये अजून काय फीचर्स आहेत ते जाणून घेऊयात. 

फीचर्स

1.14-इंच फ्लेक्स व्हील
2. पियानो ब्लॅक फिनिश
3. ड्युअल-टोन डॅशबोर्ड
4. नवीन स्टायलिश फॅब्रिक अपहोल्स्ट्री
5. डिजिटल व्हाइट एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
6. क्रोम रिंगसह HVAC नॉब्स
7. ब्लॅक इनर डोअर हँडल
8.Apple CarPlay 
9.Android Auto
10. टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम   

'ही' आहे बंपर ऑफर

आता बातमी आहे तुमच्या कामाची कारण या कारवर रेनॉल्टकडून बंपर ऑफर देण्यात आली आहे. MPV वर 60,000 रुपयांची ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही ऑफर आपल्या राज्यासोबत गोवा, केरळ आणि गुजरातमधील लोकांसाठी आहे. या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, फ्र४ अॅक्सेसरीज आणि स्क्रॅपेज पॉलिसी देण्यात येणार आहे. तर इतर राज्यांसाठी कंपीन 55,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स ऑफर देते आहे. तर चला मग गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर आपलं आणि आपल्या कुटुंबाचं कारचं स्वप्न पूर्ण करुयात. 

 

 बातमीची लिंक :  सेकंड हँड कार खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर पैसे गेलेच समजा