Twitter News: एलॉन मस्क (Elon Musk) या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या हाती ट्विटरची (Twitter) सूत्र गेली आणि त्यानं आपल्या हाती कारभार येताच कंपनीत मोठे आणि लक्षवेधी बदल करण्यास सुरुवात केली. याची सुरुवात मोठ्या पदांवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची कपात (Twitter Layoff) करण्यापासून झाली. मागोमागच कंपनीतून मोठ्या संख्येवर कर्मचारी कपात करत अनेकाना मस्कनं हादरा दिला. आपली नोकरी गेली, या भावनेनं अनेकजण संकटांच्या दरीत कोसळले, तर ज्यांची नोकरी वाचली त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
हा दिलासा काही फार कार टिकणारा नव्हता. कारण, मस्कनं पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या उद्देशानं कंपनीत काही मोठे बदल करत नजरा वळवल्या आहेत. आठवड्यातून तब्बल 80 तास काम करण्यासाठी तयार राहा (80 hours of work in a week), असा इशारा त्यानं कर्मचाऱ्यांना दिला आहे. याचाच अर्थ कर्मचाऱ्यांना दिवसातून 16 तास काम करावं लागणार आहे. (Twitter Elon Musk issued warning for closure of WFH free food)
हे इतक्यावरच थांबत नाही. तर, आता कर्मचाऱ्यांना कंपनीकडून मोफत मिळणारं खाणंही बंद होणार आहे. त्यात भरीर भर म्हणजे (Work from home) वर्क फ्रॉम होम ही सुविधाही मस्कनं बंद केली आहे. कंपनीची सूत्र हाती आल्यानंतर आणि कर्मचाऱ्यांमध्ये काहीसं गोंधळाचं वातावरण असतानाच मस्कनं सर्वांनाच संबोधित केलं. 'तुम्ही ऑफिसला येत नाही आहात, अशा परिस्थितीत तुमचा राजीनामा मी स्वीकारलाय असं समजा', या शब्दांत त्यानं नाही म्हटलं तरी कर्मचाऱ्यांना घाबरवलं आहे. येत्या काळात कंपनीला नफा न झाल्यास दिवाळखोरीची वेळ येणार आहे, असं म्हणत त्यानं सर्वच कर्मचाऱ्यांना सतर्क केलं.
मस्कनं कर्मचाऱ्यांना संबोधून सांगितलेल्या गोष्टी घाबरवणं नाही, तर आणखी काय? हाच प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर जरा थांबा. कारण, अनेकांच्या मते ती त्याची स्टाईलच आहे. कर्मचाऱ्यांना (Motivation) प्रोत्साहित करण्यासाठी तो त्यांना असंच घाबरवतो. ही Elon Musk च्या मॅनेजमेंटची अनोखी शौली आहे असं काहींचं म्हणणं. सर्वकाही ठीक, पण याचा कर्मचाऱ्यांच्या मनसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतोय त्याचं काय? हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे.