Twitter Remove Blue Tick : एलन मस्क यांच्याकडे मालकी गेल्यानंतर मायक्रोब्लॉगिंग साईट अशी जगभरात ओळख असणाऱ्या ट्विटरमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. अधिकृत अकाऊंट्सच्या टीक असो किंवा मग ब्लू टीकसंदर्बात घेतलेला आणखी कोणताही निर्णय असो. प्रत्येक वेळी मस्क आणि त्यांच्या या टीवटीव करणाऱ्या ट्विटरनं काही निर्णय घेतले आणि युजर्सना धक्काच बसला. यात सध्या भर पडताना दिसत आहे. कारण, माहिती दिल्यानुसारच आता ट्विटरकडून वेरिफाईड अकाऊंटवरून Blue Tick हटवण्यात आलं आहे. (twitter Removed Blue Tick from yogi adityanath shah rukh khan virat kohlis and many account )
सूत्रांच्या माहितीनुसार ज्या अकाऊंटकडून Blue Tick Plan साठीची रक्कम भरण्यात आलेली नाही, त्यांच्या अकाऊंटवरून हे चिन्हं हटवण्यात आलं. काही दिवसांपूर्वी म्हणजेच साधारण 12 एप्रिललाच मस्क यांनी यासंदर्भातील पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळं आता ब्लू टीक हवं असल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
नव्यानं लागू झालेल्या या ट्विटरच्या नियमानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. अभिनेता शाहरुख खान, अमिताभ बच्चन, सलमान खान यांच्यासह अनेक कलाकारांच्या अकाऊंटवरून Blue Tick नाहीसं झालं आहे. तर, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्र सिंह धोनी आणि अनेकांच्यात ट्विटर अकाऊंटवरून हे चिन्हं दिसेनासं झालं आहे. अनेक नेतेमंडळी आणि बऱ्याच इतर क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि तत्सम टीक असणाऱ्या आणि त्यासाठीची रक्कम भरली नसणाऱ्यांच्या अकाऊंटवरून हे टीक हवण्याची कारवाई करण्यात आली आहे.
मागील वर्षीच ट्विटरचे पूर्ण अधिकार आपल्या हाती येण्यापूर्वी ट्विटरकडून अनेक युजर्सचे अकाऊंट verified करण्यात आले होते. यामध्ये पत्रकार, अभिनेते आणि अभिनेत्रींसह नेतेमंडळी आणि इतरही बऱ्याच व्यक्तींचा समावेश होता. त्यावेळी ट्विटर कोणतीही रक्कम न आकारता हे Blue Tick देत होतं. पण, आता मात्र मस्क यांच्या निर्णयानंतर legacy verification badge सह किमान शुल्क आकारल्यानंतरच हे Blue Tick देण्यात येणार आहे. त्यामुळं हे शुल्क भरल्यानंतरच आता ज्यांचं Blue Tick हटवण्यात आलं आहे ते परत मिळवता येईल.
तुम्हाला Blue Tick हवंय? आधी किंमत पाहून घ्या
प्रत्येक देशानुसार ट्विटरच्या या ब्लू टीकचे दर वेगळे आहेत. संयुक्त राष्ट्रांमध्ये आईओएस या एंड्रॉइड युजर्ससाठी हे दर प्रती महिना $11 इतके आहेत. तर, भारतात iOS साठी महिन्याला 900 रुपये, वेबसाठी 650 रुपये इतका दर आकारला जाणार आहे.