बाईक: रॉयल एन्फील्डच्या विक्रित 17%ची वाढ, सुजूकीनेही मारली बाजी

क्रूज श्रेणीतील दुचाकी बनवणारी कंपनी रॉयल एनफील्डचा 2018चा शेवट गोड झाला आहे. डिसेंबर महिन्या रायल एन्फील्डची विक्री 16.67%नी वाढून 66,968 इतकी राहिली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 3, 2018, 06:37 PM IST
बाईक: रॉयल एन्फील्डच्या विक्रित 17%ची वाढ, सुजूकीनेही मारली बाजी title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : क्रूज श्रेणीतील दुचाकी बनवणारी कंपनी रॉयल एनफील्डचा 2018चा शेवट गोड झाला आहे. डिसेंबर महिन्या रायल एन्फील्डची विक्री 16.67%नी वाढून 66,968 इतकी राहिली. डिसेंबर 2016मध्ये हाच आकडा 57,398वाहन इतका होता. विशेष असे की, रॉयल एन्फील्डचे ही दुकाची गाड्यांची विक्री झाल्याचे आहेतत. 

कंपनीने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, देशांतर्गत विक्रीचा विचार करता ती 65,367 वाहने इतकी झाली आहे. जी डिसेंबर 2016मध्ये 56,316 वाहन इतकी होती. रॉयल एन्फील्डची निर्यातही 47.96% इतकी वाढली असून, ती 1,601 वाहन इतकी राहिली आहे. डिसेंबर 2016मध्ये हाच आकडा 1,082 इतका होता.

सुजुकीनेही मारली बाजी, दुचाकीच्या विक्रीत 50% वाढ

दरम्यान, दुचाकी बनवणारी आणखी एक प्रसिद्ध कंपनी सुजुकीनेही मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची डिसेंबर महिन्यातील विक्री 50.16% इतकी वाढली असून, ती 39,786 वाहन इतीक राहीली आहे. डिसेंबर 2016मध्ये ही विक्री 26,495 वाहन इतकी होती. कंपनीने दिलेली माहिती अशी की, देशांतर्गत विक्री 32,786 वाहन इतकी राहिली आहे. जी डिसेंबर 2016 मध्ये 21,362 वाहन इतकी होती.