Mobile hacks: घरबसल्या क्रॅक झालेल्या स्मार्टफोनची स्क्रीन कशी दुरुस्त करावी: आजच्या काळात आपण स्मार्टफोनवर खूप खर्च करतो. अशा वेळी फोन कधी हातातून निसटला किंवा उंच ठिकाणाहून खाली पडला तर त्याच्या दुरुस्तीचा विचार करणे आपला जीव घेतं, कारण ते महागडे काम आहे. त्यामुळे, तुमची तडा गेलेली स्मार्टफोन स्क्रीन अगदी मोफत, घरी सहज सापडतील अशा गोष्टींनी ठीक केली तर किती छान होईल! आज आम्ही तुम्हाला अशाच काही युक्त्या सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा तुटलेला डिस्प्ले घरबसल्याच ठीक करू शकता.
तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर क्रॅक असल्यास, तुम्ही बाथरूममध्ये ठेवत असलेल्या प्रोडक्टने ते ठीक करू शकता.
आणि ती गोष्ट आहे टूथपेस्ट ,जी तुम्हाला तुमच्या फोन डिस्प्लेच्या क्रॅकवर लावायची आहे, थोडीशी घासायची आहे आणि नंतर काही काळ तशीच ठेवायची आहे. आता, काही वेळाने, जेव्हा तुम्ही कापसाने टूथपेस्ट स्वच्छ कराल, तेव्हा तुमच्या फोनवरील क्रॅक दिसणार नाही
आणखी एक उत्पादन, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फोनवर पडलेल्या क्रॅकचे फिक्स करू शकता, ते म्हणजे नेल पॉलिश. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम स्क्रीनच्या क्रॅकवर नेलपॉलिश लावावी लागेल. आता काही वेळ कोरडे होऊ द्या आणि त्यानंतर धारदार रेझर ब्लेडने नेलपॉलिश काढून टाका. आता ही प्रक्रिया पुन्हा एकदा करा. तुम्हाला दिसेल की तुमच्या फोनचा क्रॅक फिक्स झाला असेल.
या जुगाडू ट्रिक्सचा अवलंब करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील क्रॅक दुरुस्त करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत