मोबाईलमध्ये नेटवर्कची समस्या आहे? तर मग वापरा या ७ टिप्स

सध्याच्या काळात प्रत्येकाच्याच हातामध्ये मोबाईल फोन पहायला मिळतात. मोबाईल फोन शिवाय अनेकांचं पानही हालत नाही. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 14, 2017, 09:28 PM IST
मोबाईलमध्ये नेटवर्कची समस्या आहे? तर मग वापरा या ७ टिप्स  title=

मुंबई : सध्याच्या काळात प्रत्येकाच्याच हातामध्ये मोबाईल फोन पहायला मिळतात. मोबाईल फोन शिवाय अनेकांचं पानही हालत नाही. 

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल हाताळण्याची सर्वांना सवय झाली आहे. मात्र, अनेकदा मोबाईल फोनच्या नेटवर्कमुळे त्रासाला सामोरं जावं लागतं. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मोबाईल नेटवर्कची समस्या निर्माण होणार नाही.

चला तर मग पाहूयात काय आहेत या खास टिप्स...

१) इंटरनेट डेटा 4G नेटवर्कवरुन 2G मध्ये स्विच करा

जर तुम्हाला एखाद्या परिसरात मोबाईलचा विक सिग्नल मिळत आहे तर तुम्ही 4G नेटवर्कवरुन 2G मध्ये स्विच करु शकता. अशा परिस्थितीत तुम्हाला इंटरनेटचा स्पीड कमी मिळू शकतो मात्र, तुमच्या विक सिग्नलचा प्रॉब्लेम संपेल.

२) मोबाईल हलक्या हाताने धरा

एक्सपर्ट्सच्या मते, मोबाईलला घट्ट पकडल्याने फोनमध्ये एक लेयर जोडली जाते ज्यामुळे सिग्नल रिसिव्ह करण्यात किंवा सेंड होण्यात अडचण निर्माण होते.

३) फोनवरुन कव्हर हटवा

जर तुमच्या फोनमध्ये वारंवार सिग्नल येत-जात असेल तर मोबाईलवरचं कव्हर काढून टाका. असं केल्यास नेटवर्कची समस्या काही प्रमाणात सुटू शकते. 

४) फोनला काचेच्या ग्लासमध्ये ठेवा

जर बराचवेळ सिग्नल येत नसेल किंवा विक सिग्नल असेल तर मोबाईल थोडावेळासाठी काचेच्या ग्लासमध्ये ठेवा यामुळे नेटवर्कची समस्या दूर होईल.

५) खुल्या जागेत फोन ठेवा

सिग्नल जर विक असेल तर घराची खिडकी उघडा. तुम्ही ओपन स्पेसमध्ये फोन घेऊन गेलात तर तुमच्या मोबाईलला चांगली रेंज मिळेल.

६) बूस्टरचा वापर करा

जर सर्व प्रयत्न करुनही रेंज चांगली मिळत नसेल तर त्या ठिकाणी बूस्टर लावा त्यामुळे कदाचित रेंजची समस्या दूर होईल.

७) सर्व कॉल दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड करा

जर एका ठराविक ठिकाणी तुम्हाला बराच वेळ सिग्नल मिळत नसेल तर त्या ठिकाणी रेंज मिळत असलेल्या दुसऱ्या सिमकार्डवर तुमचे कॉल डायव्हर्ट करु शकता.