मुंबई : पावसाळ्यात फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर्स पावसासारख्या ऋतूत कॅमेऱ्यात कैद नाही करणार असे होत नाही. पावसातली फोटोग्राफी करायची कशी, याविषयी नेहमी काहींचा गोंधळ उडत असतो.
जर तुम्ही डीएसएलआर कॅमेरा वापरत असाल, तर तुमच्यासाठी काही टिप्स...
- जर कॅमेऱ्याचा शटरस्पीड कमी ठेवला तर पावसाचा वेग कॅमेऱ्यात टिपणं अवघड होत. म्हणून कॅमेऱ्याचा शटर स्पीड हाय ठेवावा. त्यामुळे पावसाचे थेंब तसेच रस्त्यावर दिसणारे टिपूसही कॅमेऱ्यामध्ये चांगले कैद होतात.
- प्रकाश कमी असल्यास कॅमेऱ्याचा आयएसओ वाढवावा. पाऊस असताना अनेक वेळा अंधारून आलेलं असतं. आयएसओ जास्त असेल, तर शटरस्पीड वाढवायला त्याचा उपयोग होतो. आएयएसओवर शटरस्पीड अवलंबून असल्यामुळे पावसाळी वातावरणाचा अंदाज घेऊन, फोटोग्राफी करताना हे दोन्ही ठरवता येते
- पावसाळ्यात फोटोग्राफी करताना सर्वांत कमी उपलब्धता असते ती प्रकाशाची. प्रकाश चांगला असेल तर फोटोग्राफी उत्तम प्रकारे करता येते. याचमुळे पावसात फोटो काढताना बॅक लाइट असेल आणि फोटोग्राफीची पार्श्वभूमी गडद रंगाची असेल, तर पावसात काढलेले फोटो फ्रेममध्ये चांगले दिसतात.