पुण्याच्या लेडी बाहुबलीनंतर महिलेची साडीवर जबरदस्त स्केटिंग, व्हीडिओ पाहिलात?

महिलेचा साडीवर स्केटिंग (Woman Skating) करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालतोय. 

Updated: Jun 28, 2021, 04:08 PM IST
पुण्याच्या लेडी बाहुबलीनंतर महिलेची साडीवर जबरदस्त स्केटिंग, व्हीडिओ पाहिलात?   title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका महिलेचा जीममध्ये साडीत वर्कआऊट करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. लॉकडाऊनंतर जीम सुरु झाल्याच्या आनंदात या महिलेने जीममध्ये जोर बैठका मारल्या होत्या. या लेडी महिलेचं नाव डॉ. शर्वरी इनामदार असं आहे. दरम्यान या नंतर आता आणखी एका महिलेचा साडीत स्केटिंग करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर धूमाकुळ घालतोय. (Video of 46 year old woman skating on a sari goes viral)

व्हीडिओत नेमकं काय?

महिलांना दररोजच्या कामातून आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी वेळ मिळत नाही. पण आवड असली की सवड मिळतेच. या महिलेचा स्केटिंग करतानाचा व्हीडिओ पाहिल्यावर तुम्ही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाहीत.

ही महिला साडीत स्केटिंगचा आनंद घेताना दिसतेय. या 46 वर्षीय महिलेचं नाव ऑर्बी रॉय सांगितलं जात आहे. ही महिला टोरंटोतील (Toronto) नागरिक असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हीडिओ ‘Auntyskates' या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हीडिओला 68 हजारांपेक्षा अधिक जणांनी पसंती दिली आहे.  

संबंधित बातम्या :  

पुण्याची लेडी बाहुबली, ही महिला आहे तरी कोण?