Youtube वरून होईल बंपर कमाई! आताच जाणून घ्या कसा होईल तुमचा फायदा?

 शॉर्ट्स आता युट्यूब क्रिएटर्स पार्टनर प्रोग्राम (YouTube Partner Program) यामध्ये सामील केलं जाणार आहे

Updated: Sep 18, 2022, 03:47 PM IST
Youtube वरून होईल बंपर कमाई! आताच जाणून घ्या कसा होईल तुमचा फायदा? title=

You Tube Shorts Monetization: TikTok आणि Instagram Reels सोबत जशास तशी स्पर्धा करण्यासाठी आता YouTube ने कंबर कसली आहे. याने तुम्ही जर शॉर्ट्स (Youtube Shorts) बनवत असाल तर तुम्हाला याचा थेट फायदा होऊ शकतो. या माध्यमातून युट्यूब क्रिएटर्सची (You Tube Creators) ची रग्गड कमाई होऊ शकते.

मीडिया रिपोर्टनुसार याची सुरुवात पुढील वर्षांपासून होणार असल्याचं समजतंय. शॉर्ट व्हिडीओज आता युट्यूब क्रिएटर्स पार्टनर प्रोग्राम (YouTube Partner Program) यामध्ये सामील केलं जाणार आहे. याचाच अर्थ जे निर्माते यासाठी क्वालिफाय करतात त्यांना जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमावण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

दरम्यान, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे निर्माते यासाठी क्वालिफाय होणार नाहीत त्यांच्यासाठीही YouTube काही खास पर्याय आणणार आहे. The New York Times च्या रिपोर्टनुसार जे निर्माते या प्रोग्राम अंतर्गत क्वालिफाय होत नाही अशांसाठी टिप्स, सबस्क्रिप्शन आणि मर्च सेलच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे. 

तुम्हाला काय मिळेल?

Youtube कडून या नव्या प्रोग्रॅमअंतर्गत तुम्हाला TikTok पेक्षा जास्त मॉनिटायझेशन ऑप्शन्स मिळणार आहेत असं समजतंय. यामुळे youtube आपल्या स्पर्धकांना मागे टाकून कंपनी नंबर वन शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म कंपनी बनू शकेल, असा दावा केला जातोय. YouTube ने साधारण 1.5 वर्षांआधीच शॉर्ट्स हे फिचर सुरु केलं आहे. 

याबाबत स्वतः कंपनीने माहिती दिली आहे. युट्यूब शॉर्ट्स (YouTube Shorts) च्या मॉनेटायझेशनवर कंपनी काम करत असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं होतं. हे फिचर कमी अत्यंत कालावधीत प्रसिद्ध झालं आहे. येत्या काळात हे फिचर आणखी जलद गतीने लोकांपर्यंत पोहोचेल असं कंपनीच्या क्रिएटर प्रॉडक्ट विभागाचे व्हाईस प्रेसिडंट सांगतात. तब्बल 1.5 बिलियन लोकं दर महिन्याला शॉर्ट्स पाहतात, असंही कंपनी सांगते. 

Video platform youtube to start monetization feature for shorts