iPhone वर मोठे Discount, कमी किमतीत घरी घेवून जा...

iPhone घ्यायचा विचार करताय; ऑफर्स नक्की वाचा

Updated: Aug 4, 2021, 12:30 PM IST
iPhone वर मोठे  Discount, कमी किमतीत घरी घेवून जा...

मुंबई :  सध्या तरूणांमध्ये क्रेझ आहे, ती म्हणजे आयफोनची. तर तुम्हाला आयफोन खरेदी करण्याची इच्छा असेल तर विजय सेल्स सध्या उत्तम पर्याय आहे. आयफोन 12, आयफोन 11 आणि आयफोन एक्सआरवर काही ऑफर आहेत फक्त iPhones नाही तर रिटेलर iPad मॉडल, MacBooks, Apple Watch मॉडल, AirPods मॉडल आणि HomePods  ऑफर आहे. जर तुम्ही आयफोनची कोणती वस्तू खरेदी करण्यासाठी इच्छूक असाल तर विजय सेल्सच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्टोरला भेट द्या. 

या ऑफर मध्ये सध्या चर्चेत असलेल्या iPhone 12 साठी 67 हजार 400 रूपयांना मोजावे लागत आहे. विजय सेल्स ऍपल डेजमध्ये एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर केल्यास तुम्हाला चांगली सूट मिळेल. शिवाय क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा वापर केल्यास जास्तीत जास्त 7 हजार रूपयांची सूट मिळणार आहे.  ही सूट मॅकबूक प्रो पर आहे ज्याची किंमत 1 लाख 14 हजार आहे. 

ऑफरमध्ये तुम्हाला हा  फोन 1 लाख 7 हजार रूपयांना मिळणार आहे. Apple Day सेल 9 ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीचा फोन कमी किंमतीत विकत घेता येवू शकतो. iPhone 12 वर देखील मोठी सूट तुम्हाला या सेलमध्ये मिळेल. 

iphone 12 64 GB साठी 73 हजार 400 रूपये मोजावे लागणार आहे. तर HDFC बँक कार्डने फोन खरेदी केल्यास 6 हजार रूपये सूट मिळू शकते. म्हणजे iphone 12 तुम्हाला 67 हजार 400 रूपयांना मिळणार आहे. या व्यतिरिक्त देखील अनेक ऑफर्स आहेत.