64MP कॅमेरा, 500mAh बॅटरी, इनडिस्प्ले स्कॅनर ; Vivo चा दमदार स्मार्टफोन लाँच; तब्बल 2 हजारांचा डिस्काऊंट

Vivo Y200 5G भारताच लाँच करण्यात आला आहे. हा एक मिड रेंज फोन आहे. जाणून घ्या या मोबाइची किंमत आणि फिचर्स काय आहेत.    

शिवराज यादव | Updated: Oct 23, 2023, 07:36 PM IST
64MP कॅमेरा, 500mAh बॅटरी, इनडिस्प्ले स्कॅनर ; Vivo चा दमदार स्मार्टफोन लाँच; तब्बल 2 हजारांचा डिस्काऊंट title=

Vivo ने भारतात आपला नवा Y200 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा एक मिड रेंज हँडसेट आहे आणि कंपनीने यासह 2000 रुपयांच्या इंस्टंट कॅशबॅकची घोषणा केली आहे. या हँडसेटमध्ये 64 मेगापिक्सल कॅमेरा आणि 500mAh ची बॅटरी मिळते. 

किंमत किती?

Vivo Y200 5G खरेदी करायचा असेल तर त्यासाठी 21 हजार 999 रुपये मोजावे लागणार आहेत. कंपनीकडून स्पेशल लाँच ऑफर जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय 2000 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. यासाठी HDFC किंवा ICICI च्या Credit Card किंवा Debit Card चा वापर करावा लागणार आहे. 

व्हिवोचा हा हँडसेट दोन रंगाच्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यांचं नाव Desert Gold आणि Desert Green आहे. हा स्मार्टफन कंपनीच्या अधिकृत भारतीय वेबसाईट किंवा फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकता.

Vivo Y200 5G मधील स्पेसिफिकेशन

Vivo Y200 5G मध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Full HD+ रेज्योल्यूशनसह येतो. यामध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट्स देण्यात आला आहे, जो स्क्रोलिंग आणि गेमिंगदरम्यान चांगला अनुभव देतो. या फोनमध्ये HDR10+ चा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये 800Nits चा पीक ब्राइटनेस मिळतो. 

प्रोसेसर आणि रॅम

Vivo Y200 5G मध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 1 चा वापर करण्यात आला आहे. 8GB टी LPDDR4X रॅम आणि 128GB चा UFS 2.2 इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. यामध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे, जो बायोमैट्रिक पद्दतीने मोबाइलला अनलॉक करण्याचं काम करतो.

कॅमेरा

Vivo Y200 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 64-megapixel चा प्रायमरी कॅमेरा सेंसर आहे, जो f/1.79 अपर्चर आणि OIS (Optical Image Stabilization)  सह येतो. यामध्ये 2-megapixel का डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. रियर पॅनलवर Smart Aura Light flash चा वापर करण्यात आला आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

बॅटरी आणि अन्य फिचर्स

व्हिवोच्या या हँडसेटमध्ये 5000mAh चा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. जो 44W fast चार्जिंग सह येतो. हा फोन वेगाने चार्ज होऊ शकतो. या हँडसेटमध्ये आकर्षक डिझाइनचा वापर करण्यात आला आहे.