मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोनने दोन नवीन प्लान बाजारात आणलेत. त्यानुसार दिवसाला ३ जीबी डेटा मिळणार आहे. व्होडाफोननं ५११ रुपये आणि ५६९ रुपयांचे दोन लाँग टर्म रिचार्ज पॅक लाँच केले आहेत. त्यात अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग व्हाइस कॉलचा समावेश आहे.
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं दोन नवीन रिचार्ज पॅकची घोषणा केली आहे. ५११ रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये दररोज १०० एसएमएस आणि २ जीबी ३ जी/४जी डेटा मिळणार आहे. ८४ दिवसांसाठी असलेल्या या रिचार्ज पॅकमध्ये ग्राहकांना एकूण १६८ जीबी डेटा मिळेल तर ५६९ रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हाइस कॉलसह एसएमएस आणि ३ जीबी ३ जी/४जी डेटा मिळणार आहे. यात ग्राहकांना एकूण २५२ जीबी डेटा वापरता येईल.
जिओच्या ४४८ रुपयांच्या रिचार्ज पॅकची तुलना केली तर, व्होडाफोनच्या ग्राहकांना या पॅकमध्ये दररोज २जीबी ३जी/४जी डेटा मिळणार आहे. तर जिओच्या २९९ रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये दररोज ३ जीबी डेटा देण्यात आला आहे. मात्र, त्याची वैधता फक्त २८ दिवसांसाठीच आहे.