WhatsAppवर खासगी चॅट लपवायचे आहेत? हा आहे उत्तम पर्याय

इन्स्टंट मेसेजिंगसाठी व्हॉट्सअ‍ऍप सर्वात लोकप्रिय ऍप आहे. 

Updated: Jun 12, 2021, 01:49 PM IST
WhatsAppवर खासगी चॅट लपवायचे आहेत?  हा आहे उत्तम पर्याय title=

मुंबई : इन्स्टंट मेसेजिंगसाठी व्हॉट्सअ‍ऍप सर्वात लोकप्रिय ऍप आहे. व्हॉट्सअ‍ऍपवर तुमचे देखील काही असे चॅट असतील जे तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींकडून आणि इतरांपासून लपवत असाल. पण आता तुमचे खासगी चॅट लपण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तर जाणून घ्या कसे लपवाल तुमचे खासगी चॅट. व्हॉट्सअ‍ऍपवर खासगी चॅट लपविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे Archive. हे फिचर व्हॉट्सअ‍ऍपमध्ये असल्यामुळे कोणताही दुसरा ऍप डाऊनलोड करण्याची गरज नाही. 

Archiveबद्दल जर कोणाला माहिती नसेल तर तो व्यक्ती तुमचे खसगी चॅट वाचू शकत नाही. या पर्यायाचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुम्ही तुमचे खासगी चॅट काही वेळ होल्ड करून ठेवा. यानंतर आता वरच्या उजव्या बाजूला तुम्हाला Archiveचा पर्याय दिसेल. त्यानंतर Archive क्लिक करा. 

असं केल्यामुळे तुम्ही तुमचे चॅट लपवू शकता. जर लपवलेले मेसेज पुन्हा वाचायचे असतील तर व्हॉट्सअ‍ऍप ओपन करा. त्यानंतर तुम्हाला Archive ऑप्शन दिसेल. Archiveवर क्लिक करा.   Archiveकेलेले मेसेज काही वेळ होल्ड केला. त्यानंतर तुम्हाला Unarchive Chat करा, त्यानंतर तुम्हाला तुमचे लपवलेले मेसेज वाचता येतील.