What is Blue Aadhaar Card: भारतात आधार कार्ड हे महत्त्वाचे दस्तावेज आहे. सरकारी व खासगी कामांसाठी आधर कार्ड देणे बंधनकारक आहे. आधार कार्ड हा दस्तावेजाचा महत्त्वाचा पुरावा आहे. आधार कार्डवर 12 अंकी क्रमांक असतो. तुमच्या ओळखीचा आणि कायम निवासाचा पुरावा म्हणून ते देशभरात वैध आहे. पण तुम्हाला माहितीये का ब्लू आधार कार्डदेखील असते. यालाच बाल आधार कार्ड असंही म्हणतात.
भारतात 5 वर्षांपेक्षा कमी मुलांसाठी एक खास पद्धतीचे आधार कार्ड असते. याला बाल आधार कार्ड किंवा ब्लू आधार कार्ड असंही म्हणतात. पौढांच्या आधार कार्डपेक्षा थोडे वेगळे म्हणजेच निळ्या रंगाचे हे आधार कार्ड असते. या आधार कार्डबाबत जाणून घेऊया.
सामान्य आधार कार्डवर बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे निशाण घ्यावे लागतात. मात्र, लहान मुलांच्या आधार कार्डवर (नीळे आधार कार्ड) असे काहीच नसते. मुलांचे हात आणि पाय नाजूक आणि छोटे असतात. डोळ्यांचे निशाण घेणे खूप कठिण असते आणि कधीकधी ते व्यवस्थित येतदेखील नाहीत. त्यामुळं लहान मुलांच्या आधार कार्डवर फिंगरप्रिंट आणि डोळ्यांचे निशाण नसतात. त्याव्यतिरिक्त त्यांच्या आई-वडिलांच्या किंवा पालकांच्या आधार कार्डशी जोडलेला एक खास नंबर किंवा फोटोने लहान मुलांच्या आधार कार्डला विशिष्ट नंबर दिला जातो
- लहान मुलांचे आधार कार्ड बनवण्यासाठी यूआयडीएआय वेबसाइट(https://uidai.gov.in/) वर जवळचे आधार कार्ड सेंटरची यादी पाहा.
कोणती कागदपत्रे गरजेचीः लहान मुलांचे जन्मदाखला, तुमचे ओळखपत्र, रहिवासी पुरावा (आधार कार्ड, व्हॉटिंग कार्ड, रेशन कार्ड) आणि लहान मुलाचा अलीकडेच एक फोटो
- आधार कार्ड केंद्रात गेल्यानंतर नोंदणी फॉर्म भरणे गरजेचे आहे. हा फॉर्म तुम्ही यूआयडीआय वेबसाइटवरुन आधीपासूनच डाउनलोड करु शकता.
- लहान मुलाचा फोटोः नोंदणी फॉर्म भरल्यानंतर तिथले अधिकारी मुलाचा फोटो घेतील.
- संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर व गरजेचे कागदपत्रे दिल्यानंतर फॉर्म आधारकार्ड केंद्रात द्या.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर एक पावती मिळेल. या पावतीवर तुमच्या मुलाचा आयडी असेल. या आयडीने तुमच्या मुलाचे आधारकार्ड येण्यासाठी किती वेळ लागेल हे तुम्ही ऑनलाइन ट्रॅक करु शकता.
लहान मुलांचे आधार कार्ड बनवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ब्लू आधार कार्ड हे तुमच्या मुलाच्या पाच वर्षांपर्यंतच वैध असले. जेव्हा मुलगा 5 वर्षांचा होईल तेव्हा त्याचे हाताचे ठसे आणि डोळ्यांचे निशाण आणि फोटो घेऊन नवीन आधार कार्ड काढावे लागेल. हे तु्ही कोणत्याही आधार कार्ड केंद्रात करु शकता.