Facebook प्रमाणे आता WhatsApp ही Log Out करता येणार, कसं ते जाणून घ्या..

WhatsApp multi-device feature : सोशल मीडियावरील फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप  आहेत. आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपला बघूनच होत असते. आता मेटाकडून यासारख्या अॅपसाठी नवीन फीचर आणले आहेत. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 26, 2023, 03:52 PM IST
Facebook प्रमाणे आता WhatsApp ही  Log Out करता येणार, कसं ते जाणून घ्या.. title=
WhatsApp And Facebook Log Out Feature

WhatsApp New feature : सोशल मीडियावरील फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp And Facebook) यांसारखे अ‍ॅप न वापरणारी लोक अगदी हातावरील बोटांइतकी असतील. पण जगभरातील असंख्य युजर्स आहेत ज्यांच्याकडे फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप आहेत. त्यातच मेटा या जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया कंपनीने आपल्या युजर्सना फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप आणि मेसेंजरसारख्या अ‍ॅप्सवर एकाच वेळी नियंत्रण ठेवण्याचा पर्याय दिला आहे. तुम्ही जर व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर एक नवीन फीचर अपडेट झाले आहे. ज्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअॅप सहज लॉगआऊट करणे शक्य होणार आहे. 

जगभरात 200 कोटींहून अधिक लोक व्हॉट्सअ‍ॅपचा (WhatsApp New feature ) वापर करतात. व्हॉट्सअॅपमध्ये चॅटिंग, फोटो-व्हिडिओ, व्हॉइस-व्हिडिओ कॉलिंगसारख्या सुविधामुळे व्हॉट्सअॅपची लोकप्रियता जास्त प्रमाणात वाढली. व्हॉट्सअॅप आपल्या आवश्यक गरजेपैकी एक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचपार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणली आहे. या फीचरचा पुन्हा एकदा आणलं असून याचा मोठा फायदा आता युजर्सना होणार आहे.  कारण तुम्ही फेसबुक प्रमाणे आता व्हॉट्सअॅपवरही लॉगआऊट करता येणार आहे. 

व्हॉट्सअॅपचे नवीन लॉग आउट फीचर

जसे फेसबुक ऑनलाइन जाताना लॉगिन करता आणि ऑफलाइन जाण्यासाठी लॉग आउट करता. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपवरही ही सुविधा लवकरच येणार आहे. यूजर्सना व्हॉट्सअॅपमध्ये नवीन लॉग आउट फीचर मिळणार आहे. या फीचरची खूप दिवसांपासून मागणी होती. कारण फोनमध्ये इंटरनेट सुविधा असल्यामुळे आपण WhatsApp मधील सर्व वापरकर्ते 24 तास अॅक्टिव्ह असतो. त्यामुळे सतत येणाऱ्या मेसेजेसमुळे नजर नेहमी फोनवरच राहते. कधी ऑफिसचे मेसेज, कधी बिझनेस मेसेज तर कधी मित्र-मैत्रिणींचे मेसेज. अशा परिस्थितीत वैयक्तिक आयुष्य कुठेतरी कमी होत चालले आहे. आता तुमची यातून सुटका होणार आहे.

दरम्यान मेटाकडून आता व्हॉट्सअॅपवरून अकाउंट डिलीट करण्याचा पर्यायही हटवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे नवीन लॉगआउट फीचर व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक यूजर्सना त्यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटमध्ये हे फीचर दिसत आहे. 

व्हॉट्सअॅपचे नवीन लॉग आउट फीचर व्हॉट्सअॅप मेसेंजर आणि व्हॉट्सअॅप बिझनेस व्हर्जनमध्ये दिले जाईल. हे ऍपल युजर्स आणि अँड्रॉइड युजर्स दोन्हीसाठी उपलब्ध असेल. जोपर्यंत हे फिचर अधिकृतपणे समाविष्ट होत नाही तोपर्यंत या फीचरची प्रतीक्षा असेल आणि पूर्ण आल्यानंतर व्हॉट्सअॅपशी नेहमी कनेक्ट राहण्याची सवयही सुधारेल.

व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण एकच व्हॉट्सअॅप अकाउंट चार ठिकाणी वापरण्यात आले आहे. मल्टी डिव्हाईस हे एक नवीन वैशिष्ट्य आहे आणि येत्या काही वर्षांत ते वापरकर्त्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. मल्टी-डिव्हाइस वैशिष्ट्यांतर्गत, एका खात्यासह अनेक उपकरणे म्हणजे अनेक ठिकाणी प्रवेश उपलब्ध असेल. व्हॉट्सअॅप यूजर्स गेल्या काही दिवसांपासून आणखी काही फीचरची वाट पाहत आहेत.