'या' Smartphones वर WhatsApp होणार बंद; लगेचच पाहा यादीत तुमचा फोन तर नाही ना

याला नेमका पर्याय काय? 

Updated: Oct 1, 2021, 09:25 AM IST
'या' Smartphones वर WhatsApp होणार बंद; लगेचच पाहा यादीत तुमचा फोन तर नाही ना title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : काळ बदलत गेला तसतसं तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेनुसार मानवाच्या हाती अनेक नवे पर्याय आणि संवाद साधण्यासाठी अनेक नवनवीन गोष्टी समोर येतात. व्हॉट्स अॅप हा त्यापैकीच एक. साध्यातल्या साध्या फोनवरही या मेसेजिंग अॅपची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. पण, आता मात्र काही स्मार्टफोनमध्ये WhatsApp बंद होणार आहे. 

नोव्हेंबर महिन्यापासून WhatsApp जुन्या अँड्रॉईड 4.0 किंवा Ice Cream Sandwich असणाऱ्या डिवाईसमध्ये काम करणं बंद करणार आहे. अँड्रॉईड 4.1 किंवा अँड्रॉईड जेली बीनवर मात्र व्हॉट्स अप चालणार आहे. 

जर तुमच्याकडे गॅलेक्सी S3, LG Optimus L3, Galaxy Core, Huawei Ascend G740 किंवा इतर जुने स्मार्टफोन आहेत तर तुम्हाला व्हॉट्सअपपासून वंचित रहावं लागू शकतं. IPhone 4S किंवा अन्य जुन्या मॉडेलवरही व्हॉट्सअप सपोर्ट करणार नाहीये. ज्यामुळं आता हे मेसेजिंग अॅप वापरण्यासाठी तुम्हाला सिस्टीम अपग्रेड करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. 

नेमकं कोणत्या फोनमध्ये व्हॉट्सअप बंद? 
Samsung: The Samsung Galaxy Trend Lite, Galaxy Trend II, Galaxy SII, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2, Galaxy Core, Galaxy Ace 2

LG: The LG Lucid 2, Optimus F7, Optimus F5, Optimus L3 II Dual, Optimus F5, Optimus L5, Optimus L5 II, Optimus L5 Dual, Optimus L3 II, Optimus L7, Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6, Enact, Optimus L4 II Dual, Optimus F3, Optimus L4 II, Optimus L2 II, Optimus Nitro HD and 4X HD, Optimus F3Q

ZTE: ZTE Grand S Flex, ZTE V956, Grand X Quad V987, Grand Memo

Huawei: Huawei Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S, Ascend D2