मुंबई : व्हॉट्सअॅप हे एक जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अॅप आहे. या अॅपच्या अनेक युझर्ससाठी व्हॉट्सअॅप नवीन फिचर्स आणत असतो. आता असेच काही नवीन फिचर्स व्हॉट्सअॅप घेऊन आला आहे. हे नवीन फिचर्स कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्स येत असतात. मात्र फार कमी लोकांना या नवीन फीचर्सबद्दल माहिती नसते आहे. आज आम्ही तुम्हाला इतरांचे स्टेटस आणि मेसेज गुप्तपणे कसे पाहता येणार आहेत, याची माहिती देणार आहोत.
नवीन फिचर्स
Read Receipt बंद केल्याने, लोकांना तुमच्या वाचलेल्या संदेशांची माहिती मिळणार नाही. म्हणजेच जर तुम्ही वापरकर्त्याने पाठवलेला मेसेज वाचला तर साधारणपणे व्हॉट्सअॅपवर ब्लू टिक येते. हे फीचर बंद केल्यानंतर ब्लू टिक येणार नाही. यामुळे, तुम्ही त्याचे मेसेज वाचले आहेत की नाही हे कोणालाही कळणार नाही.
तसेच, या फीचरमुळे तुम्ही इतरांचे स्टेटसही गुपचूप पाहू शकता.म्हणजेच, जेव्हा तुम्ही एखाद्या वापरकर्त्याचे व्हॉट्सअॅप स्टेटस पाहता तेव्हा तुमचे नाव त्याच्या सीन लिस्टमध्ये दिसणार नाही.
ते कसे काय?
सर्व प्रथम व्हॉट्सअॅप उघडा.सेटिंगमध्ये जा आणि Privacy च्या पर्यायावर जाऊन क्लिक करा. आता Read Receipt चे फीचर दिसेल, ज्याच्या समोर एक टिक बॉक्स असेल. तुम्हाला यावर ऑफ बटण दाबावे लागेल. यानंतर तुम्ही वरील सर्व फीचर्स वापरू शकाल.
फीचर्सचे तोटे
या फीचरचे काही तोटे देखील आहेत. व्हॉट्सअॅपचे हे फीचर लास्ट सीड फीचरसारखेच आहे. म्हणजेच, जो हे फीचर बंद करेल त्याला ब्लू टिक दिसणार नाही. दुसरी व्यक्ती तुमचे मेसेज वाचत आहे की नाही याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार नाही. स्टेटसच्या बाबतीतही असेच होईल, परंतु तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे फीचर चालू करू शकता आणि तुमचे स्टेटस कोणी पाहिले आहे ते तपासू शकता.