हा Whatsapp मेसेज तुम्हालाही आलाय? आताच व्हा सावध नाहीतर....

तुमचं खातं किंवा माहिती लीक होऊ नये असं वाटत असेल तर या गोष्टी नक्की करा.... या मेसेजला कोणताही प्रतिसाद देऊ नका!

Updated: Nov 14, 2021, 10:41 PM IST
हा Whatsapp मेसेज तुम्हालाही आलाय? आताच व्हा सावध नाहीतर.... title=

मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढली त्याच सोबत ऑनलाइन पेमेंट करण्याचं प्रमाणही वाढलं. ऑनलाइन पेमेंटसोबत फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं हॅकर्स बँक अकाऊंट रिकामे करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

सोशल मीडियाचा वापर खूप वाढला आहे. WhatsApp तर सर्वचजण आजकाल वापरत आहेत. आता Whatsapp वरून देखील फसवणूक करण्याचं प्रमाण वाढलं आहे. तुम्हालाही जर हा मेसेज आला असेल तर आजच सावध व्हा. याचं कारण म्हणजे या जाळ्यात तुम्ही अडकलात तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. 

हॅकर्सने रचलेल्या या कटाला 'फ्रेंड इन नीड' असं नाव देण्यात आलं आहे. मला पैशांची खूप गरज आहे असे मेसेज Whatsapp वर केले जातात. यामध्ये मी परदेशात फसलो आहे किंवा काहीतरी मोठं घडलं आहे असं सांगून पैसे उकळले जातात. 

यूकेमध्ये राहणाऱ्या किमान 59% लोकांना या घोटाळ्याचा सामना करावा लागला आहे आणि या घोटाळ्याची माहिती व्हॉट्सअॅपनेच केली आहे आणि लोकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. नॅशनल ट्रेडिंग स्टँडर्ड्स स्कॅम टीमचे लुई बॅक्स्टर म्हणतात की मेसेज पाठवणारा तुमचा मित्र किंवा नातेवाईक आहे असे तुम्हाला वाटण्यासाठी घोटाळेबाज तुमच्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या वतीने मेसेज पाठवतो

तुमचा मित्र किंवा नातेवाईक आहे. नंबर बदलला आहे किंवा काहीही खोटं कारण सांगतो जे साधारण लोकांना पटणारं असेल. त्यामुळे पैसे उकळणं हॅकर्सला अधिक सोयीचं होतं. तुम्हाला मेसेज करून, हे लोक एकतर तुमची वैयक्तिक माहिती विचारतात, तुमच्याकडे पैसे मागतात किंवा खाते तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

त्यामुळे अनोळखी लोकांशी बोलणं शक्यतो टाळा. आपली अधिक माहिती Whatsapp वर कोणालाही देऊ नका. तुम्हाला जर असा मेसेज आला तर खात्री केल्याशिवाय कोणतीही मदत करू नका. या गोष्टी पाळल्य़ा तर तुमचे पैसे किंवा माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचणार नाहीत. ते सुरक्षित राहातील वेळीच सावध व्हा.