मुंबई : फेसबूकच्या F8 डेव्हलपर कॉन्फ्रेंसमध्ये व्हॉट्सअॅपने घोषणा केली होती की, ते यावर्षी वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची देखील सुविधा आणणार आहेत. पण आता व्हॉट्सअॅपने माहिती दिली आहे की, हे फीचर आजपासून जगभरात लाईव्ह झालं आहे. आजपासून अँड्रॉईड आणि iOS दोन्ही युजर्स याचा वापर करु शकणार आहेत. WhatsApp चं ग्रुप कॉलिंग फीचर एका वेळेला चार लोकांना सपोर्ट करतो. हे चार लोकं कुठेही असले तरी याचा वापर करता येणार आहे. WhatsApp च्या या नव्या फीचरमुळे यूजर्स जास्तीत जास्त 4 जणांना व्हिडिओ किंवा वॉईस कॉल एकावेळी करु शकता.
व्हॉट्सअॅपच्या मते, मागील काही वर्षापासून व्हॉट्सअॅपवर युजर्सने वॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेतला आहे. आमच्या यूजर्सने प्रत्येक दिवशी WhatsApp कॉल्सवर 2 बिलियन पेक्षा अधिक वेळ घालवला आहे. आम्ही या गोष्टीची घोषणा करतांना खूप उत्साहित आहोत की आता ग्रुप कॉलिंगची सुविधा देखील सुरु झाली आहे.
व्हॉट्सअॅप यूजर्सला कंपनीने विश्वास दिला आहे की, त्यांचे सर्व मॅसेज आणि ग्रुप कॉल एंड-टू इनक्रिप्टेड आहे. त्यामुळे प्रायव्हसी बाबतीत जे लोकं चिंतीत आहे त्यांना आता टेन्शन घेण्याचं कारण नाही. हे नवं फीचर WhatsApp च्या iOS आणि अँड्रॉईड व्हर्जनसाठी उपलब्ध आहे. 2016 मध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु करण्यात आली होती. तर 2014 मध्ये व्हॉट्सअॅप वॉईस कॉलिंग सुविधा सुरु झाली होती.