तुमच्या WhatsApp चे मेसेज कोण कोण वाचतंय ? लगेच ही सेटींग पाहा

WhatsApp Hack:  तुमचे व्हॉट्सअॅप मेसेज कोणीतरी वाचत आहे असे तुम्हाला वाटते का? तुम्ही ते अगदी सोप्या पद्धतीने तपासू शकता. तसेच WhatsApp मेसेज एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतात. मात्र आता असे  काही मार्ग आहेत ज्यामध्ये तुमचे WhatsApp चे मेसेज कुणी वाचू शकत नाही. जाणून घ्या त्यासाठी काय करावे लागेल... 

Updated: Sep 10, 2022, 04:24 PM IST
तुमच्या WhatsApp चे मेसेज कोण कोण वाचतंय ? लगेच ही सेटींग पाहा  title=

Whatsapp Hack : जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp चे लाखो-करोडो युझर्स आहेत. हे whatsapp तुम्हाला प्रत्येक  smartphone मध्ये मिळेलच इतके ते प्रसिद्ध आहे. whatsapp वरून तुम्हाला आपल्या मित्र-मैत्रिणींना, कलिगना व्हिडिओ कॉलिंगसह मजकूर संदेश, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ फाइल्स पाठवता येत असतात. हे व्हॉट्सअ‍ॅप अनेकदा दुसरा कोणीतरी वाचत असल्याचा आपल्याला संशय येतो. जर तुम्हालाही असं वाटतं असेल तर खालील दिलेल्या या सोप्या टिप्य वाचून ते शोधा.   

व्हॉट्सअॅप वेब आणि मल्टी-डिव्हाइस सपोर्ट यासारख्या व्हॉट्सअॅप फीचर्सचे नाव तुम्ही ऐकले असेलच. कदाचित तुम्ही त्यांचाही वापर कराल. या वैशिष्ट्यांच्या मदतीने, तुम्ही एकाच वेळी दोनपेक्षा जास्त डिव्हाइसवर एकच व्हॉट्सअॅप खाते वापरू शकता. मल्टी-डिव्हाइस सपोर्ट आल्यापासून वापरकर्त्यांच्या प्राथमिक डिव्हाइसला इंटरनेटशी कनेक्ट करणे आवश्यक नाही.

अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीने एकदा तुमचा फोन घेतला आणि दुसर्‍या डिव्हाइसवर खात्यात लॉग इन केले तर तो तुमचे संदेश सहजपणे वाचू शकेल. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या WhatsApp वर अतिरिक्त सुरक्षा फीचर वापरावे.

‘या’ सेटींगद्वारे कळणार ? 
तुम्हाला जर एखादा व्यक्ती तुमचे मेसेज वाचत असल्याचा संशय असेल तर WhatsApp वर जाऊन Linked Device वर जाऊन चेक करा. या पर्यायात किती डिवाईसवर तुमचं WhatsApp कनेक्ट आहे, याची माहिती मिळणार आहे. जर तुम्ही Log In न केलेल्या ठिकाणी तूमचं डिवाई दिसत असेल तर त्वरीत त्यातून बाहेर या. हा एक सोपा पर्याय आहे. चोरीने मेसेज वाचणाऱ्यांचा छडा लावण्याचा, त्यामुळे तुम्ही हा पर्याय वापरून पहा.