WhatsApp Ban Accounts: आजकाल बहुतेक लोक स्मार्टफोन (smartphone) आणि इंटरनेट (internet) वापरतात. लोक एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी सोशल मेसेजिंग अॅप Whatsaap चा वापर करतात. तुम्हीही व्हॉट्सअॅप यूजर (whatsapp users) असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. Whatsapp ने ऑगस्ट महिन्यात 23.28 लाखाहून अधिक भारतीय खातीवर बंदी घातली आहेत. त्यापैकी 10 लाखांहून अधिक खाती वापरकर्त्यांकडून कोणताही अहवाल येण्यापूर्वीच बंदी घालण्यात आली होती. कंपनीने शनिवारी ही माहिती दिली.
कंपनीने जाहीर केलेला डेटा
व्हॉट्सअॅपने आपल्या अहवालात म्हटले आहे की, 1 ऑगस्ट 2022 ते 31 ऑगस्ट 2022 दरम्यान अॅपची 23,28,000 खाती ब्लॉक करण्यात आली. त्यापैकी 10,08,000 खाती वापरकर्त्यांकडून कोणतीही तक्रार येण्यापूर्वी ब्लॉक करण्यात आली आहे.
जुलैमध्ये 23 लाखांहून अधिक खाती बंद
नवीन आयटी नियम 2021 अंतर्गत जुलैमध्ये भारतातील 23 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली. भारतात जुलै महिन्यात WhatsApp वर 574 तक्रारी आल्या आणि 27 वर कारवाई करण्यात आली. देशातील 40 कोटींहून अधिक युजर्स असलेल्या या प्लॅटफॉर्मने जूनमध्ये खराब रेकॉर्ड असलेल्या 22 लाखांहून अधिक अकाऊंटवर बंदी घातली होती.
वाचा : 'या' गोष्टी नवरात्रीच्या महाअष्टमीला केल्या पाहिजेत, देवीची विशेष कृपा असते
माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दर महिन्याला डेटा जारी
कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, IT नियम 2021 नुसार, आम्ही जुलै 2022 साठी आमचा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. मासिक रिपोर्टमध्ये नोंदवल्याप्रमाणे, WhatsApp ने ऑगस्ट महिन्यात 2.3 मिलियन म्हणजेच 23 लाखांहून (2387,000) अधिक अकाऊंटवर बंदी घातली आहेत.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.