WhatsAppचे प्रायव्हसी फिचर; चॅट्स असे ठेवा सुरक्षित

असं करा WhatsApp fingerprint lock...

Updated: Nov 9, 2019, 10:09 PM IST
WhatsAppचे प्रायव्हसी फिचर; चॅट्स असे ठेवा सुरक्षित
संग्रहित फोटो

मुंबई : मेसेजिंग ऍप 'व्हॉट्सअप' (WhatsApp) गेल्या काही दिवसांपासून सतत नव-नवे फिचर्स आपल्या ऍपमध्ये जोडत आहे. 'व्हॉट्सअप'ने आता जबरदस्त फिंगरप्रिंट फिचर (WhatsApp fingerprint lock) आणलं आहे. या फिचरद्वारे 'व्हॉट्सअप चॅट' सुरक्षित करता येतं. हे फिचर काही दिवस आधीपासूनच iOS वर आहे. पण आता हे अॅन्ड्रॉइड (Android) फोनवरही उपलब्ध आहे. 

कसं कराल WhatsApp fingerprint lock - 

अॅन्ड्रॉइड फोनमध्ये व्हॉट्सअप ओपन करा. उजव्या बाजूला वर असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा आणि सेटिंगमध्ये (Settings) जा. 

app

सेटिंगमध्ये Account ऑप्शनमध्ये Privacy वर क्लिक करा. खाली fingerprint lock ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करुन फिंगरप्रिंटसह अनलॉक टॉगल करा.

app

app

त्यानंतर Time Duration सेट करा. म्हणजेच किती वेळासाठी तुम्ही ऍप लॉक करु इच्छिता. Immediately, after one minute आणि after 30 minutes असे ऑप्शन  दिसतील.

app

  

या स्टेपनंतर WhatsApp fingerprint lock फिचर सेट होईल. 

Time Duration वेळी शक्य असल्यास Immediately ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरुन Whatsapp chat लगेच लॉक होईल.

ज्या स्मार्टफोनला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, त्या फोनमध्ये WhatsApp fingerprint lock फिचर सेट होईल.

सध्या उपडेट झालेल्या व्हाट्सअप व्हर्जनमुळं अनेक व्हाट्सअप युजर्सकडून तक्रारींचे सूर उमटू लागलेत. IOS आणि अँड्रॉइड धारक व्हाट्सअप युजर्सच्या सेलफोनची बॅटरी व्हाट्सअपच्या नवीन व्हर्जनमुळे जलदगतीने कमी होत असल्याचं दिसून आलंय. अनेक युजर्सने यासंबंधात फोनवरील स्क्रीनशॉट काढून ते ट्विटर आणि तत्सम समाज माध्यमांवर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.