Okinawaची नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; काय आहेत फिचर्स

काय आहेत फिचर्स...

Updated: Nov 9, 2019, 04:21 PM IST
Okinawaची नवी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; काय आहेत फिचर्स

नवी दिल्ली : Okinawa स्कूटर्सने इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ५९ हजार ९९० रुपये इतकी आहे. कंपनीने ही स्कूटर महिला आणि युवकांच्या दृष्टीने लॉन्च केली आहे. स्कूटरसह मोटर आणि बॅटरीवर ३ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. स्कूटर स्पार्कल व्हाइट आणि स्पार्कल ब्लू रंगात लॉन्च करण्यात आली आहे.

स्कूटरमध्ये १.२५ KWH ची लीथियम ऑयन बॅटरी देण्यात आली आहे. जी २५० वॅटची पॉवर जनरेट करते. बॅटरीसह वॉटरप्रूफ BLDC मोटर लावण्यात आली आहे, ज्याला ४० वोल्टची १.२५ KWH ची लीथियम ऑयन बॅटरी पॉवर देते. बॅटरीला अॅन्टी थेफ्ट फीचरसह इंन्स्टॉल करण्यात आलं आहे. 

स्कूटरचा जास्तीत जास्त वेग २५ किमी ताशी आहे. स्कूटर सिंगल चार्जवर ५० ते ६० किमीपर्यंत चालवली जाऊ शकते. ब्रेकसाठी फ्रन्टमध्ये डिस्क आणि रियर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. स्कूटरचा ग्राउंड क्लिअरन्स १६० mm आहे. बॅटरीचा चार्जिंग वेळ ४ ते ५ तास इतका आहे.

  

स्कूटरमध्ये ऑटो हँडल लॉक, ऑटो मोटर लॉक, बॅटरी लॉक, मोबाईल चार्जिंग, एलईडी विंकर्स, एलईडी हेडलाइट, सेल्फ स्टार्ट पुश बटन असे फिचर्स देण्यात आले आहेत. स्कूटरची सीट हाइट ७४० mm आहे.