WhatsApp Alert: नवीन वर्षात व्हॉट्सअॅप युजर्सला मोठा झटका, 'या' फोनमधून WhatsApp झाले बंद

WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले असून कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. आता नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी झटका देणार आहे. 

Updated: Jan 2, 2023, 02:09 PM IST
WhatsApp Alert: नवीन वर्षात व्हॉट्सअॅप युजर्सला मोठा झटका, 'या' फोनमधून WhatsApp झाले  बंद title=

Whatsapp Stop Working Smartphones : आजच्या युगात सर्वांकडेच स्मार्टफोन दिसून येतो. स्मार्टफोन म्हटलं की WhatsApp आलचं. मात्र आता या WhatsApp संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. दरम्यान  नवीन वर्षात WhatsApp अनेक बदल केले असून काही स्मार्टफोन्स आहेत ज्यावर आजपासून WhatsApp सपोर्ट दिला जाणार नाही. आता व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी अॅपचे नवे व्हर्जन असावे लागणार आहे.  

जुन्या फोनमध्ये WhatsApp चे हे नवे फिचर चालणार नाही. असे अनेक स्मार्टफोन्स आहेत ज्यांना नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स दिले जात नाहीत आणि ते व्हॉट्सअॅपच्या नवीन व्हर्जनला सपोर्ट करत नाहीत. त्यामुळे आजपासून काही स्मार्टफोन्सवर WhatsApp सपोर्ट दिला जाणार नाही.  

यापूर्वी सपोर्ट बंद करण्यात आला

याआधीही कंपनी अनेक जुन्या फोनसाठी वेळोवेळी व्हॉट्सअॅपचा सपोर्ट बंद करत असते. याबाबत GizChina ने सर्वप्रथम तक्रार केली होती. त्यानंतर ३१ डिसेंबर 2022 पासून या फोन्सचे अपडेट बंद करण्यात आले होते.

यावेळी कंपनीने एक-दोन नव्हे तर 49 फोनसाठी व्हॉट्सअॅपचा सपोर्ट बंद केले आहे. यामध्ये अनेक ब्रँडच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. अॅपल, सॅमसंग व्यतिरिक्त इतर ब्रँड्सचाही यामध्ये समावेश आहे. तथापि, बहुतेक वापरकर्त्यांना याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही.

वाचा : क्रिकटप्रेमींसाठी New Year ची भेट, सौरव गांगुलीने शेअर केली 'ही' मोठी बातमी 

संपूर्ण यादी पहा

iPhone 5  मध्ये WhatsApp, iPhone 5c, Archos 53 Platinum, Grand S Flex ZTE, Grand X Quad V987 ZTE, HTC Desire 500, Huawei Ascend D, Huawei Ascend D1, Huawei Ascend D2, Huawei Ascend G740, Huawei Ascend Mate, P1 बंद होणार आहे. 

याशिवाय हे Quad XL, Lenovo A820, LG Enact, LG Lucid 2, LG Optimus 4X HD, LG Optimus F3, LG Optimus F3Q, LG Optimus F5, LG Optimus F6, LG Optimus F7, LG Optimus L2 II, LG Optimus L3 II , LG Optimus L3 II Dual, LG Optimus L4 II, LG Optimus L4 II Dual बंद होणार आहे.

LG Optimus L5, LG Optimus L5 Dual, LG Optimus L5 II, LG Optimus L7, LG Optimus L7 II, LG Optimus L7 II Dual, LG Optimus Nitro HD, Memo ZTE V956, Samsung Galaxy Ace 2, Samsung Galaxy Core, Samsung Galaxy S2, Samsung Galaxy S3 mini, Samsung Galaxy Trend II, Samsung Galaxy Trend Lite, Samsung Galaxy Xcover 2, Sony Xperia Arc S, Sony Xperia miro, Sony Xperia Neo L, Wiko Cink Five आणि Wiko Darknight ZT देखील बंद होणार आहे.