पंतप्रधान मोदी कोणत्या कंपनीचा मोबाईल आणि सिमकार्ड वापरतात..! माहितीये?

पंतप्रधान मोदी कोणता स्मार्टफोन, सिमकार्ड वापरतात?

Updated: Sep 18, 2019, 03:46 PM IST
पंतप्रधान मोदी कोणत्या कंपनीचा मोबाईल आणि सिमकार्ड वापरतात..! माहितीये?

मुंबई : सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच त्यांचा ६९वा वाढदिवस साजरा केला. मोदींच्या वाढदिवशी अनेकांनी त्यांनी फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अनेक जण मोदींबाबत अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अनेकांना मोदी कोणत्या कंपनीचं नेटवर्क वापरतात याबाबतही जाणून घ्यायचं असतं. तुम्हाला माहितेय का? मोदी कोणत्या कंपनीचा मोबाईल आणि त्यांचं सिमकार्ड कोणत्या कंपनीचं आहे? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अॅपलचा iPhone 6 फोन वापरतात, अशी माहिती आहे. २०१८ मध्ये चीन आणि दुबईच्या अधिकाधिक यात्रां दरम्यान त्यांना आयफोन ६ (iPhone 6 Series) सीरीज वापरताना पाहण्यात आलं आहे. 

पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडिया मोहिमेनंतर, देशात स्मार्टफोनच्या वापरात मोठी वाढ झाली. सोशल मीडिया साइट्सवर पंतप्रधान मोदींचा ग्राफ इतर अनेक राजकारण्यांहून अतिशय पुढे आहे. ट्विटरवर मोदींचे ५ कोटींहून अधिक फॉलोवर्स आहेत. फेसबुकवर त्यांना जवळपास ४.५ कोटी यूजर्स फॉलो करतात. त्याशिवाय इन्स्टाग्रामवरही त्यांचे २.८३ कोटीच्या जवळपास फॉलोवर्स आहेत. 

सोशल मीडियावर फॉलोवर्सच्या बाबतीत मोदी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ट ट्रम्प यांच्यापेक्षाही पुढे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या कंपनीचं सिमकार्ड वापरतात, याबाबतही त्यांच्या चाहत्यांना दोन वर्षांपूर्वी माहिती मिळाली. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी त्यांच्या मोबाईलचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. त्या स्क्रिनशॉटमध्ये वोडाफोनचं नेटवर्क दिसलं होतं. त्याच्याच आधारे, पंतप्रधान मोदी वो़डाफोन कंपनीचं सिमकार्ड वापरत असल्याचं बोललं जातं.

पंतप्रधान मोदीच्या विश्वासातील व्यक्ती आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह अॅपल एक्सएस (iPhone XS) फोन वापरत असल्याची माहिती आहे. अॅपलने आयफोन एक्सएस जवळपास एक वर्षांपूर्वी लॉन्च केला होता.