घरातलं WiFi वापरण्याची योग्य पद्धत माहितये? हे वाचा, नाहीतर मोठी किंमत फेडावी लागेल

WiFi नेमकं कसं वापरायचं याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?   

Updated: Apr 26, 2022, 02:11 PM IST
घरातलं WiFi वापरण्याची योग्य पद्धत माहितये? हे वाचा, नाहीतर मोठी किंमत फेडावी लागेल  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

WiFi Tips and Tricks to Avoid Virus and Hacking: हल्लीच्या दिवसांमध्ये सर्वजण स्मार्टफोनला पसंती देताना दिसतात. बऱ्याच अंशी हा स्मार्टफोनच सध्याच्या पिढीचा जवळचा मित्र झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. याच निमित्तानं वायफायचा होणारा वापरही कमालीचा वाढला आहे. पण, WiFi नेमकं कसं वापरायचं याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? 

घरात असणाऱ्या वायफायचं पासवर्ड सर्वप्रथम बदला. कारण, कंपनीकडून सुरुवातीला देण्यात येणारं पासवर्ड अतिशय सोपं असतं. ज्यामुळं तुम्ही तुमच्या अनुषंगानं पासवर्ड सेट करावं. 

ये नहीं होना चाहिए आपके वाईफाई का नाम

हॅकिंग आणि वायरसपासून वाचण्यासाठी तुम्ही वायफायचं नावही बदला. नेटवर्कला एक नवं नाव द्या, म्हणजे एसएसआयडी द्या. इथं एक बाब लक्षात घ्या , की हे नाव देताना यामध्ये तुमचं ठिकाण, किंवा तत्सम कोणतीही माहिती नसावी. 

सेटिंग्स में जाकर करें ये बदलाव

डिफॉल्ट सेटिंग्समुळं तुमचं वायफाय राऊटर अनेकदा हार्ड ड्राईव्हला कनेक्ट करण्यासाठीची परवानगी मागतं. याला रिमोट अॅक्सेस म्हणता. यावेळी तुम्ही रिमोट सेटिंग्समध्ये जात तिथं अॅक्सेस बंद करा, असं केलं असता वायरसचा अटॅक टाळता येतो. 

ऑपरेटिंग सिस्टम को अपडेट करना न भूलें

ज्याप्रमाणं तुम्ही स्मार्टफोनची सेटींग सातत्यानं अपडेट करत असता, त्याचप्रमाणं तुम्ही राऊटरची ऑपरेटिंग सिस्टीमही अपडेट ठेवा. यामुळं राऊटरला सिक्युरिटी अपडेट आणि नवे फिचर मिळतात. यासाठी तुम्ही ऑटोमॅटिक अपडेट्स हा पर्यायही निवडू शकता. 

वाईफाई को इस समय बंद कर दें

असं गरजेचं नाही, की तुम्ही वायफाय सतत सुरुच ठेवावं. ज्यावेळी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता नाही, किंवा तुम्ही एखाद्या वेळी गराबाहेर जात आहात तेव्हा तुम्ही राऊटर न विसरता बंद करा.