Redmi Note 12 Pro+ 5G: रेडमीच्या नव्या सीरिजबाबत मोबाईलप्रेमींना कायमच उत्सुकता राहिलेली आहे. आता कंपनी 2023 च्या सुरुवातील 200 एमपी कॅमेरा असलेल्या जबरदस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची मोबाईलप्रेमींमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. कंपनी 5 जानेवारी 2023 रोजी Redmi Note 12 Pro सीरिज लाँच करणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर कंपनीने याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. तसेच या फोनमधील फीचर्सची माहितीही दिली आहे. 12 डिसेंबरला या स्मार्टफोनचा फोटो पोस्ट करताना कंपनीने सांगितले की, फोनच्या टॉप-एंड स्मार्टफोनमध्ये 200MP कॅमेरा असेल. चला जाणून घेऊयात Redmi Note 12 Pro सीरीजबद्दल...
कंपनीने अधिकृतपणे जाहीर केले आहे की Redmi Note 12 Pro+ मॉडेलमध्ये 200MP प्राथमिक कॅमेरा असेल. कंपनीने अधिकृत वेबसाइटची लिंक शेअर केली आहे जेणेकरून लोकांना फोनबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. रिपोर्ट्सनुसार, बेस मॉडेल Redmi Note 12 Snapdragon 4 Gen 1 SoC सह सुसज्ज असेल. तर Pro आणि Pro Plus मध्ये Dimensity 1080 SoC असण्याची शक्यता आहे. फोनची किंमत आणि इतर फीचर्सचा उल्लेख करण्यात आलेला नाही. पण हा फोन अधिक बॅटरी आणि स्टायलिश डिझाइनमध्ये येईल अशी अपेक्षा आहे. बाकी माहिती फोन लाँच झाल्यावरच कळेल.
Greatest ever on a smartphone camera = #RedmiNote12 Pro+ 5G!
This camera on the #SuperNote is the only camera you'll ever need.
P.S. Your wish is about to come true on 05.01.2023!
Stay tuned: https://t.co/bSN7VljgxA pic.twitter.com/u6wN6jN8M9
— Redmi India (@RedmiIndia) December 12, 2022
बातमी वाचा- मोबाईलमध्ये इंटरनेट नसेल तरी पाहता येणार TV; लवकरच D2M सेवा
Xiaomi चा Supernote कार्यक्रम 5 जानेवारी रोजी होणार आहे. यामध्ये अनेक उत्पादने सादर केली जाणार असून येत्या वर्षभरात ते कोणत्या नवीन गोष्टी करणार आहेत आणि कोणती उत्पादने सादर करणार आहेत, याबाबत कंपनी सांगेल. उर्वरित मॉडेल्सबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi Note 12 Pro मध्ये 50MP चा प्राथमिक लेन्स असेल. Pro आणि Pro + ला 8MP अल्ट्रा वाइड लेन्स मिळतील. 3MP मॅक्रो लेन्स असेल.