मुंबई : स्मार्टफोनच्या जगात रोज काही ना काही नवीन गोष्टी होताना दिसतात. आता शाओमी (Xiaomi) लवकरच एक नवीन स्मार्टफोन बाजाराच आणणार आहे. MI Note सीरीजच्या Mi Note 10 स्मार्टफोनचं पोस्टर जाहीर करण्यात आलं आहे. या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचे ५ कॅमेरे देण्यात आले आहेत. १०८ मेगापिक्सल आणि ५ कॅमेरे असणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा करण्यात येत आहे. १० नोव्हेंबर रोजी हा फोन लॉन्च होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Mi Note 10 स्मार्टफोनला १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, १२ मेगापिक्सल टेलीफोटो कॅमेरा, एक मायक्रो आणि एक पोट्रेट शूटर देण्यात आला आहे. ३२ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे.
Introducing the world's FIRST 108MP Penta Camera. A new era of smartphone cameras begins now! #MiNote10 #DareToDiscover pic.twitter.com/XTWHK0BeVL
— Xiaomi #First108MPPentaCam (@Xiaomi) October 28, 2019
Zoom in for details, not pixels. See epic details with 108MP camera. #MiNote10 #DareToDiscover pic.twitter.com/v1VvSsvygD
— Xiaomi #First108MPPentaCam (@Xiaomi) October 30, 2019
शाओमीच्या Mi Note 10 स्मार्टफोनला ६.४७ इंची डिस्प्ले, ५,१७० mAhचा बॅटरी बॅकअप, स्नॅपड्रॅगन ८५५+ प्रोसेसर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज देण्यात आला असल्याचं बोललं जात आहे.
Mi Note 10 फोनच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.