ऑटो एक्सपोमध्ये Yamaha R15 लॉन्च

ऑटो एक्सपो २०१८मध्ये यामाहानं त्यांची पहिली आर्टिफिशियल इंटलिजन्स असलेली बाईक R15 लॉन्च केली आहे.

Updated: Feb 7, 2018, 05:53 PM IST
ऑटो एक्सपोमध्ये Yamaha R15 लॉन्च title=

नवी दिल्ली : ऑटो एक्सपो २०१८मध्ये यामाहानं त्यांची पहिली आर्टिफिशियल इंटलिजन्स असलेली बाईक R15 लॉन्च केली आहे. यामाहाच्या या बाईकला १४९ सीसी(२.०वर्जन) आणि १५५ सीसी(३.० वर्जन) इंजिन देण्यात आली आहेत.

यामाहाच्या या हायटेक बाईकमध्ये एलईडी हेडलाईट, युएसबी चार्जरची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे बाईक चालवत असतानाही तुम्हाला मोबाईल चार्ज करता येणार आहे. या बाईकची किंमत १.२५ लाख रुपये आहे.

याआधी यामाहानं १२ जानेवारीला एफझेड सीरिजला १० वर्ष पूर्ण झाली म्हणून एफझेडएस-एफआई ही बाईक लॉन्च केली होती. दिल्लीच्या एक्स शोरुममध्ये या बाईकची किंमत ८६,०४२ रुपये आहेत. या बाईकला १४९ सीसी एयरकूल्ड फोर स्ट्रोक इंजिन आहे.

या बाईकच्या नव्या वेरियंटमध्ये मागच्या बाजूला २२० एमएम आणि पुढे २८२ एमएमचे हायड्रोलिक सिंगल ब्रेक लावण्यात आले आहेत. या सिस्टीममुळे बाईकचा स्पीड जास्त असला तरी सहज ब्रेक दाबून बाईकला नियंत्रित करता येईल. एफझेडएस-एफआईच्या नव्या वेरियंटमध्ये ग्राफिक्सलाही अपडेट करण्यात आलं आहे. या बाईकची स्पर्धा सुझुकी जिक्सर, बजाज पल्सर एनएस १६० आणि होंडा सीबी हॉर्नेट १६० आरबरोबर असेल.