युट्यूब लवकरच ही सुविधा करणार बंद

ऑनलाईन व्हिडिओंसाठी शहरांपासून खेड्यांपर्यंत प्रसिद्ध असलेले स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूब लवकरच त्यांच्या वेबसाईटवरून एक सुविधा बंद करणार आहे.

Updated: Jan 14, 2019, 06:13 PM IST
युट्यूब लवकरच ही सुविधा करणार बंद title=

नवी दिल्ली - ऑनलाईन व्हिडिओंसाठी शहरांपासून खेड्यांपर्यंत प्रसिद्ध असलेले स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूब लवकरच त्यांच्या वेबसाईटवरून एक सुविधा बंद करणार आहे. आतापर्यंत युट्यूबवर अपलोड केलेला कोणताही व्हिडिओ थेट ट्विटरवर शेअर होण्याची सुविधा युट्यूबकडून देण्यात आली होती. जर युट्यूबच्या खातेधारकाने त्याच्याकडील सेटिंग्जमध्ये तशी सुविधा निवडली असेल, तर त्याने युट्यूबवर अपलोड केलेले सर्व व्हिडिओ थेट ट्विटरवर शेअर केले जात होते. पण आता ही सुविधा बंद होणार आहे. त्यामुळे युट्यूब वापरणाऱ्यांना व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मग त्यावरील शेअरचा पर्याय निवडून त्या माध्यमातूनच ट्विटर किंवा इतर सोशल मीडिया वेबसाईटवर व्हिडिओ शेअर करता येतील. 

युट्यूबच्या सेटिंग्जमध्ये जाऊन कनेक्टेड अॅप्सवर क्लिक करायचे तिथे Share your public activity to Twitter हा पर्याय निवडला की युट्यूबवरचे व्हिडिओ थेट ट्विटरवर जात होते. पण आता ही सुविधा बंद होईल. हा पर्याय तिथून काढण्यात येणार आहे. आता कोणताही व्हिडिओ पू्र्णपणे अपलोड झाल्यानंतर ग्राहकाला सोशल मीडियावर तो शेअर करण्यासाठी बटण दिसतील. तिथून क्लीक केल्यावरच हे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करता येतील. 

आधीच्या पद्धतीने ज्यांचे युट्यूबवरचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर झाले आहेत. त्यामध्ये नवी पद्धत लागू झाल्यानंतर कोहीही बदल होणार नाहीत. आधीच शेअर झालेले व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून दिसू शकतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.