'झी २४ तास' इंस्टा LIVE : पालक-मुलांचे 'ऑनलाइन' संरक्षण शक्य

 पालक आणि मुलांच्या ऑनलाईन संरक्षणाबद्दलची माहिती सायबर तज्ञ तन्मय दीक्षित यांनी झी २४ तासच्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये दिली. 

Pravin Dabholkar | Updated: May 26, 2020, 05:12 PM IST
'झी २४ तास' इंस्टा LIVE : पालक-मुलांचे 'ऑनलाइन' संरक्षण शक्य title=

प्रविण दाभोळकर, झी २४ तास, मुंबई : सध्या मोबाईल-इंटरनेटचा जमान्यात लहान मुलांवर प्रत्येक क्षणाला लक्ष ठेवणे हे पालकांसमोर मोठे आव्हान असते. बऱ्याचदा यातील अनेक सवई पालकांना देखील असतात. त्याचे अनुकरण मुलांकडून केले जाते. पण ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या जगात पालक आणि मुलांनी काय काळजी घ्यायला हवी ? यासंदर्भातील माहिती सायबर तज्ञ तन्मय दीक्षित यांनी झी २४ तासच्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये दिली. 

आजकाल सर्व विद्यार्थ्यांचे शाळा, क्लासेसमधील लेक्चर्सचे ऑनलाइन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून होत आहेत. लॉकडाऊनपासून मुलांना ऑनलाईन ट्रेनिंग मिळू लागले आहे. अशावेळी एखादे एप्लिकेशन वापरताना काय काळजी घ्यावी याबद्दल तन्मय दीक्षित यांनी सांगितले.  

विद्यार्थ्यांनी स्वतः चे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, शाळेतील रजिस्टेशन नंबर, आयडी नंबर, अशाप्रकारे नाव ऑनलाईनमध्ये ठेवू नयेत तसेच व्हिडिओ ऑन करायची सुद्धा गरज नाही. लेक्चर से मातृभाषेत असेल तर उत्तम राहीलं. जेणेकरून हे सायबर गुन्हेगार आणि क्रिमिनल यांनी लेक्चरमध्ये शिरकाव केला किंवा डेटा लीक करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा काय बोलणे चालू आहे ?  हे लक्षात येणार नाही. त्याच बरोबर अपलोड झालेल्या माहितीचा गैरवापर सुद्धा होणार नाही.

पाल्य जेव्हा नेटफलिक्स, गुगल प्ले स्टोअर वापरतात तेव्हा पालक म्हणून जबाबदारी बाळगायला हवी. अकाउंट सेटिंग मध्ये जाऊन आपण कुठल्या वयोगटात चे कार्यक्रम दिसायला हवे लिमिट सेट करू शकतो. प्लेस्टोर च्या सेटिंग मध्ये युजर सेटिंग मध्ये रेंटल कंट्रोल आहे. लहान मुलांना जो मोबाईल देणार आहात त्याचा वरती इंटरनेटचा वेळ लिमिटेडचे द्यावा.लॅपटॉप मोबाईल टॅब हे वापरताना हॉलमध्ये किंवा मोठ्या व्यक्तींच्या समोरचा हाताळण्यास द्यावे असेही ते म्हणाले.

काय काळजी घ्याल ?

जास्त वेळ हेडफोन लावून बसू नये त्याच बरोबर मोबाईल हा डोळ्याच्या समोर राहील असा ठेवावा जास्त जवळ जर घेतला तर  डोळ्यांना त्रास होऊ शकतो आणि लहान मुलांचा मेंदू आणि कवटी याच्या वरती सुद्धा रेडिएशनचा त्रास होऊ शकतो.

इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर हा कशा चांगल्या प्रमाणात प्रकारात होऊ शकतो हे जर त्यांना शिकवले गेले तर ती चूक होऊ शकणार नाही. उदाहरणार्थः शिक्षण घेण्यासाठी नवीन नवीन गोष्टी चा शोध घेण्यासाठी, व मिळवलेल्या ज्ञानाचा अर्थार्जनाचा साठी जर उपयोग केला तर तो योग्य उपयोग होऊ शकतो.

काय बरोबर आहे काय चुकीचे आहे हे सुद्धा लहान मुलांना सांगणे जेणेकरून लहान मुलं चुकीच्या मार्गाला जाणार नाही. टीव्हीवरील पेपर मधील आणि रेडिओवरील ज्या बातम्या आहे त्या खरे आहेत ज्याच्या मध्ये सत्यता पडताळणी गेलेली आहे जेणेकरून अशा पोस्ट जर पाठवल्या गेल्या तर त्या समाज उपयोगी असू शकतात. 

आलेली पोस्ट न तपासता जर फॉरवर्ड केली तर ते नकळत सायबर गुन्ह्यांमध्ये सुद्धा अडकू शकतात कारण ती अफवा पसरवली किंवा अंधश्रद्धा पसरवली असे सुद्धा होऊ शकते किंवा नको त्या वेबसाईट वरती वेळ पण जाऊ शकतो अथवा बनावट वेबसाईट वरती जाऊन शॉपिंग पण केले जाऊ शकते आणि याचा आर्थिक आणि मानसिक फटका सहन करावा लागू शकतो.