close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

एटीएसकडून पुन्हा मोठी कारवाई, २४ वर्षीय संशयित ताब्यात

प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी कारवाई 

Updated: Jan 27, 2019, 02:30 PM IST
एटीएसकडून पुन्हा मोठी कारवाई, २४ वर्षीय संशयित ताब्यात

ठाणे : काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या कारवाईनंतर पुन्हा एकदा दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसकडून आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. देशद्रोही  संघटनेशी संपर्क असल्याच्या संशयावरुन त्याला अटक करण्यात आली असून, तलाह असं त्याचं नाव आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाकडून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क जप्त करण्यात आलं आहे. शिवाय त्याचा  आयसीसशी संबंध असल्याची बाबही समोर येत आहे. 

प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली होती. यापूर्वीही अशाच प्रकारच्या कारवाईत एटीएकसकडून एकूण नऊ तरुणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. आयसीसशी संबंधीत एका व्यक्तीच्या हे तरुण संपर्कात होते. देशाबाहेर असणाऱ्या त्या व्यक्तीचा खुलासा मात्र अद्यापही झाला नसल्याचं स्पष्ट होत आहे. 

दरम्यान, गेल्या दोन ते चार दिवसांमध्ये एटीएसकडून करण्यात येणाऱ्या कारवायांना यश आल्याचं स्पष्ट होत असून घातपाताचा कट उधळण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून देशात सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, गुप्तहेर यंत्रणांपासून पोलीस यंत्रणाही सर्वत्र नजर ठेवून असल्याचं स्पष्ट होत आहे.