ठाणे : ठाण्यामध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत, तसंच कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थित होते. आई वडिलांनी जन्म दिला पण ओळख मला शरद पवारांमुळे मिळाली अशी कबुली जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिली.
लोकांनी साथ दिली तर काहीही होऊ शकतं. यावेळी तुमचा हा प्रतिनिधी महाराष्ट्राचा चेहरा बदलेल, त्यांना अशीच साथ द्या असं आवाहन शरद पवार यांनी या कार्यक्रमावेळी बोलताना केलं.
जितेंद्र आव्हाड यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात, शरद पवारांनी आव्हाडांचं कौतुक करत महाराष्ट्राला कर्तुत्ववान मंत्री मिळाला असल्याचं सांगितलं. जिथे कर्तुत्व असतं, कर्तुत्वाला प्रोत्साहन कऱण्याची भूमिका घेतली, तर समाजातील प्रश्न सोडवणारं नेतृत्व उभं राहू शकत असून हेच आव्हाडांनी महाराष्ट्राला दाखवून दिल्याचं पवार म्हणाले.
याप्रसंगी उपस्थित राहून उपस्थित कळवा आणि ठाणे परिसरातील कलाप्रेमींना शुभेच्छा दिल्या. यासमयी #शिवसेना खासदार @rautsanjay61 तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष @PawarSpeaks साहेब यांच्यासोबत गप्पा रंगल्या. pic.twitter.com/fVGYws1hp6
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 26, 2020
तर आपल्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोन विठ्ठल असल्याचं यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले. राज्यातल्याप्रमाणेच दिल्लीतही परिवर्तन होणार आणि त्याचे सूत्रधार हे सुद्धा शरद पवारच असतील असा दावा, संजय राऊतांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांनी आयोजित केलेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात शरद परावांसह, खासदार संजय राऊत, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.