अकोला : अकोल्यात तब्बल दिड हजार विद्यार्थी आणि पालकांनी शाडूमातीच्या गणेशमूर्ती बनवल्यात. अखिल भारतीय क्षेत्रीय महासभेनं आयोजित केलेल्या शाडूमाती गणेशमूर्ती प्रशिक्षण कार्यशाळे या गणेशमूर्ती साकारण्यात आल्या. अकोल्याच्या डाँ. पंजाबराव देशमुख क्रूषी विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. यात ५ ते ६५ वयोगटातील नागरिकांनी आपला सहयोग नोंदविला.
क्षेत्रीय महासभेनं या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना गणेशमुर्ती घडविण्यासाठी माती आणि रंग उपलब्ध करून दिले. शिवसेना आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनाही आपला मोह आवरता आला नाही. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवत पर्यावरणपुरक गणेशोत्सवाचं महत्व या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पटवण्यात आलं.
यावेळी अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि मुर्तिकार शरद कोकाटे यांनी डोळ्यावर पट्टी बांधून सात मिनिटांत गणेशमुर्ती साकारलीय.