मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री  आणि अर्थमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यात उजेडात आले आहे.

Updated: Jul 2, 2018, 11:05 PM IST

चंद्रपूर : मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यात उजेडात आले आहे. ही धमकी पत्राद्वारे दिलीय. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरच्या वडाळामधल्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय. याच गावातल्या २ व्यक्तींना त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने हा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद श्रीरामे असं आरोपीचं नावं आहे.तो चिमूर तालुक्यातल्या वडाळा गावचा रहिवासी आहे.